EPFO Update : ईपीएफओकडून मोठी अपडेट, एका क्लिकवर पाहा पासबुक

EPFO Update : भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती दिली. एका क्लिकवर कर्मचाऱ्यांना पासबुकमधील घडामोड पाहता येईल. बऱ्याचदा ईपीएफओची साईट लवकर उघडत नसल्याची ओरड असते. त्यानंतर ईपीएफओने महत्वाची माहिती शेअर केली आहे.

EPFO Update : ईपीएफओकडून मोठी अपडेट, एका क्लिकवर पाहा पासबुक
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:06 PM

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात कोट्यवधी कर्मचारी काम करतात. त्यांना भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (EPFO) फायदा त्यांना माहिती आहे. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासह इतर फायदे देण्यात ईपीएफओ महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. तसेच कर्मचारीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यात पण ही संघटना तत्पर असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा विश्वास ईपीएफओवर दिसतो. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफ रक्कमेचे (PF Amount) व्यवस्थापन ईपीएफओ करते. आता संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती दिली. एका क्लिकवर कर्मचाऱ्यांना पासबुकमधील घडामोड पाहता येईल. बऱ्याचदा ईपीएफओची साईट लवकर उघडत नसल्याची ओरड असते. त्यानंतर ईपीएफओने महत्वाची माहिती शेअर केली आहे.

Umang App वर सेवा ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा देते. ईपीएफओ ठळकपणे पीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय या सेवा पुरवते. ईपीएफओच्या या सेवा महत्वपूर्ण आहेत. तुम्ही सहजरित्या या सेवांना ट्रॅक करु शकता. त्यासाठीची प्रक्रिया पण अत्यंत सोपी आहे. ईपीएफओने अनेक सेवा Umang App वर उपलब्ध करुन दिल्या आहेत.

प्रत्येक महिन्यात वाढते पीएफ प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक वाटा ईपीएफच्या रुपाने जमा होतो. याशिवाय कंपनीकडून दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात योगदान देण्यात येते. या दोन्ही माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक रक्कम जमा होते. विविध ठिकाणी ही रक्कम अत्यंत उपयोगी पडते. या रक्कमेवर ईपीएफओकडून ठराविक व्याज देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

पीएफचा पैसा असा येतो उपयोगी पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम कर्मचारी त्यांच्या गरजेच्या वेळी काढू शकतात. नवीन घर खरेदीसाठी, घराच्या डागडुजीसाठी पीएफची रक्कम काढता येते. मुलांच्या शिक्षणासाठी पीएफ खात्यातून तुम्ही रक्कम काढू शकतात. नोकरी गेल्यास पीएफ खात्यातील रक्कम काढता येते. कोरोना काळात ईपीएफओने कोविड आगाऊ रक्कम काढण्याची मुभा दिली होती.

पासबुकमध्ये काय मिळते माहिती कर्मचाऱ्याला पासबुकमध्ये अनेक सुविधांची माहिती मिळते. कर्मचाऱ्याच्या खात्यात किती रक्कम आहे. यापूर्वी त्याने किती रक्कम कधी काढली याची माहिती मिळते. तुम्ही पीएफ पासबुक घरबसल्या काही सोप्या स्टेप फॉलो करुन पाहु शकता. यामध्ये उमंगचा मोठा फायदा होतो.

असे करा ई-पासबुक डाऊनलोड

  • उमंग एप उघडा, ईपीएफओ सर्च करा
  • आता व्ह्य पासबुक पर्यायवर क्लिक करा
  • त्यानंतर युएएन क्रमांक टाका
  • मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो सबमिट करा
  • सदस्य आयडी निवडा. ई-पासबुक डाऊनलोड करा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.