‘ईपीएफओ’ यंदा लवकरच जमा करणार तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे; तुमचा ‘पीएफ बॅलन्स’ जाणून घेण्याची ही आहे सोपी पद्धत…

यंदा, दसरा किंवा दिवाळीपूर्वी पीएफ खात्यात व्याज जमा केले जाऊ शकते. या वेळी दसरा आणि दिवाळीपासून पैसे ईपीएफओमध्ये येऊ शकतात अशी अपेक्षा आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, पीएफचा कमी दर पाहता, ईपीएफओ व्याजाचे पैसे वेळेपूर्वी जमा करू शकते.

‘ईपीएफओ’ यंदा लवकरच जमा करणार तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे; तुमचा ‘पीएफ बॅलन्स’ जाणून घेण्याची ही आहे सोपी पद्धत...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 2:33 PM

Employees Provident Fund : यावेळी भविष्य निर्वाह निधीचे (PF) व्याजाचे पैसे खात्यात जमा करण्यास विलंब होणार नाही. या वेळी लाखो कर्मचाऱ्यांना 2022 संपण्यापूर्वीच पीएफचे पैसे मिळू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संघटना म्हणजेच EPFO या खात्यांमध्ये व्याज जमा करते. हे काम सहसा वर्षाच्या शेवटी केले जाते. पण यावेळी खात्यात आधीच पैसे येऊ शकतात. यावेळी अशी अपेक्षा आहे की EPFO आपली संपूर्ण प्रक्रिया आधीच पूर्ण करेल. झटपट पैसे जमा होण्यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे, यावेळी ८.१ टक्के दराने व्याज (8.1 per cent interest) मिळेल, जे ४३ वर्षांतील नीचांकी पातळी आहे. दोन म्हणजे, कमी व्याजदराने पैसे दिल्यास EPFO ला दावा निकाली काढणे सोपे जाईल. असे असले तरी, अद्याप सरकारकडून यासंदर्भातील औपचारिक घोषणा (Formal announcement) झालेली नाही.

पीएफ काढत असाल, तर ८.५ टक्के मिळेल व्याज

FY21 साठी EPF व्याजाचे पैसे डिसेंबर 2021 मध्ये जमा केले गेले. वित्त मंत्रालयाच्या औपचारिक मंजुरीनंतर, 2021-22 पर्यंत व्याज दर जमा होईपर्यंत, सर्व EPF दावे 8.5% दराने निकाली काढले जातील. याचा फायदा देशातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही EPF सदस्य म्हणून नोकरी गमावण्यासह कोणत्याही कारणास्तव तुमचा PF निधी काढत असाल तर, दाव्याची निपटारा 8.1% नव्हे तर 8.5% व्याजदराने होईल.

तुमच्या खात्यातील पीएफचे पैसे तपासायचे असतील तर..

पीएफचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे कसे कळेल. हे EPFO पोर्टल, मेसेज किंवा उमंग अॅपद्वारे तपासले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

• EPFO पोर्टलवर लॉगइन करा. ‘आमच्या सेवा’ वर जा आणि आता ड्रॉप-डाउन मेनूमधून “कर्मचार्‍यांसाठी” पर्याय निवडा, “सेवा” अंतर्गत ‘युजर्स लॉगइन’ या पर्यायावर क्लिक करा.

• एक लॉगिन पेज दिसेल. तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड सक्रिय केल्यानंतर एटंर करा.

• एकदा लॉग इन केल्यानंतर, तुम्ही एसएमएस पाठवून तुमच्या EPF खात्यात PF शिल्लक तपासू शकता याशिवाय मोबाइल क्रमांक 7738299899 वर एसएमएस पाठवूनही तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स तपासता येईल. पसंतीच्या भाषेतील पहिले तीन वर्ण वापरा.

जर तुम्हाला इंग्रजीत अपडेट्स मिळवायचे असतील तर इंग्रजी शब्दाची पहिली तीन अक्षरे वापरा म्हणजे EPFOHO UAN ENG तुम्हाला मेसेज अपडेट्स मराठीत मिळवायचे असतील तर EPFOHO UAN MAR टाइप करा. ही सुविधा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे.

मिस्ड कॉल देऊन, पीएफ बॅलन्स तपासा

• तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून अधिकृत फोनवर मिस कॉल देऊन तुमच्या ईपीएफ शिल्लकबद्दल चौकशी करू शकता. तुमचा UAN तुमच्या KYC लिंक असेल तेव्हाच ही सेवा उपलब्ध होईल

• एकदा UAN तुमच्या KYC तपशीलांशी लिंक झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या • मिस्ड कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ तपशीलांसह एक एसएमएस प्राप्त होईल.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...