Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filling : तुमचे उत्पन्न नसेल करपात्र तरी भरा आयटीआर, असे होतील चमत्कार!

ITR Filling : तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरी आयटीआर भरा. त्यामुळे तुम्हाला असा मोठा फायदा होईल.

ITR Filling : तुमचे उत्पन्न नसेल करपात्र तरी भरा आयटीआर, असे होतील चमत्कार!
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR) करण्यासाठी सध्या वेळ काढा. तुम्ही जर नोकरदार असाल आणि तुमची मिळकत, उत्पन्न करपात्र असेल तर तुमच्यासाठी आयटीआर फाईल करणे क्रमप्राप्त आहे. 31 जुलै 2023 रोजीपर्यंत तुम्हाला आयटीआर फाईल करता येईल. त्यानंतर तुम्ही आयटीआर फाईल केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. करदात्यांना (Tax Payers) 31 डिसेंबरपर्यंत दंड भरुन आयटीआर फाईल (ITR Filing) करता येईल.

करपात्र नसाल तर.. ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांना तर कर भरणे अत्यावश्यक आहे. पण ज्यांचे उत्पन्न करपात्र नसते. ते आयटीआर फाईल करत नाहीत. आयटीआर फाईल करणे आवश्यक नसल्याने ते त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसाल तरी आयटीआर फाईल करणे महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक लाभ तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही विचार पण केला नसेल असे फायदे तुम्हाला होतील.

हा तर उत्पन्नाचा दाखला जर तुमचे वेतन इनकम टॅक्स स्लॅबच्या परीघात येत नसले तरी आयटीआर दाखल करणे फायदेशीर ठरु शकते. हे आयटीआर कागदपत्र तुम्हाला एक प्रकारे उत्पानाचा दाखलाच ठरेल. तुमचे उत्पन्न किती हे त्याआधारे स्पष्ट होईल. बँकेकडून कर्ज घेताना अथवा क्रेडिट कार्ड खरेदी करताना तुम्हाला उत्पन्नाचा प्रुफ, दाखला द्यावा लागतो. अशावेळी आयटीआर फाईल करुन यासंबंधीचा पक्का दस्तावेज तयार होईल.

हे सुद्धा वाचा

क्लेम करु शकता रिफंड अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न करपात्र नसताना पण टीडीएस कपात करतात. अशावेळी इनकम टॅक्स रिटर्न दाकल करुन तुम्हाला टीडीएसवर दावा दाखल करता येतो. आयकर खाते तुमच्या अधिकृत खात्यात टीडीएस (TDS) रक्कम हस्तांतरीत करु शकते.

व्हिसासाठी करु शकता अर्ज जर तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरी आयटीआर दाखल करता येतो. त्याआधारे परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या व्हिसासाठी अर्ज करता येतो. व्हिसा एप्लिकेशनसाठी आयटीआरसंबंधिचे कागदपत्रे मागण्यात येते. अनेक देशांसाठी व्हिसा मिळण्याअगोदर प्राप्तिकर दाखवावा लागतो. त्यावरुन त्या व्यक्तीच्या मिळकतीचा पुरावा मिळतो.

नुकसानीसाठी करता येतो दावा तुम्ही वेळेच्या आधी आयटीआरवर क्लेम कराल तर तुम्हाला कॅपिटल गेन वा व्यवसायात झालेल्या नुकसानीचा दावा करता येईल. आयकर विभागाच्या नियमानुसार, कॅरी फॉरवर्ड नुकसानीचा दावा करता येतो. पण हा फायदा जे नियमीत स्वरुपात निश्चित आर्थिक वर्षात आयटीआर भरतात, त्यांनाच मिळतो.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.