आयटी रिटर्नची मुदत वाढवा; करदात्यांची मागणी, पोर्टल क्रॅशमुळे ट्विटरवर ट्रेंड

आयकर रिटर्न भरण्याचे रडगाणे काही केल्या कमी होईना. पोर्टल वारंवार क्रॅश होत असल्याने आयटी रिटर्न मुदत वाढविण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

आयटी रिटर्नची मुदत वाढवा; करदात्यांची मागणी, पोर्टल क्रॅशमुळे ट्विटरवर ट्रेंड
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 2:15 PM

मुंबई : आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत हातातोंडाशी आलेली असताना पुन्हा एकदा यासंबंधीचे पोर्टल क्रॅश होत असल्याने करदात्यांनी आयकर विभागाच्या नावाने शिमगा घातला. ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेस मुळे आणि तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत करदात्यांनी आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याविषयी केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाकडे सर्व करदात्यांचे लक्ष लागले आहे. (Extende the ITR filing due date to December 31; Twitter trend,: many users urged the government to extend the due date)

दोन वेळा वाढवली मुदत

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 31 डिसेंबर रोजी ही शेवटची तारीख आहे. यापूर्वी दोनदा  मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्यांदा 31 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ती 31 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण या वर्षी मार्च महिन्यापासूनच नवीन पोर्टलविषयी ओरड सुरू होती. आयटी रिटर्न भरताना पोर्टलवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे करदात्यांचे म्हणणे आहे.

ट्विटरवर घुमला आवाज

दरम्यान, आयटी रिटर्न भरताना पोर्टल हॅंग होत असल्याने करदात्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयटी रिटर्नची मुदत वाढवून देण्याच्या मागणीसाठी करदात्यांनी ट्विटरवर आवाज बुलंद केला. आयटीआर भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी ट्रेंड सध्या सुरू आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी दोन दिवस उरले असून यानंतर आयकर विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात स्वयंपाकाला महागाईची फोडणी? डिजिटल पेमेंटमुळे खिशाला कात्री, नियमांच्या नावाखाली बँकांची वसुली 

आरोग्य विमा कंपन्यांच्या फसवणुकीवर जालीम इलाज, हक्कांविषयी रहा जागरूक, बिनधास्त करा कंपन्यांच्या दाव्याची चिरफाड

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

(Extende the ITR filing due date to December 31; Twitter trend,: many users urged the government to extend the due date)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.