फेसबुक छोट्या व्यावसायिकांना देणार 50 लाखांपर्यंत कर्ज
Loan Business | लघु व्यवसाय कर्ज उपक्रमाच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना कर्ज मिळेल. योजनंतर्गत व्यापाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना प्रथम त्यांच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करावी लागेल.
मुंबई: फेसबुककडून लहान व्यापाऱ्यांना 50 लाखांपर्यंत कर्ज देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी फेसबुकने इंडिफी या पतपुरवठा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे देशातील लहान व्यावसायिकांना कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर फक्त पाच दिवसांत पैसे संबंधित कर्जदाराच्या बँक खात्यात जमा होतील. या कर्जासाठीच्या व्याजदरातही सवलत मिळणार आहे.
लघु व्यवसाय कर्ज उपक्रमाच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना कर्ज मिळेल. योजनंतर्गत व्यापाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना प्रथम त्यांच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करावी लागेल. यानंतर व्यापाऱ्यांना पाच ते 50 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर 17 ते 20 टक्के इतके व्याज आकारले जाईल. महिला व्यावसायिकांना व्याजदार 0.2 टक्क्यांची सूट मिळेल. सध्या देशातील 200 शहरांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. कर्जदाराने आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर पाच दिवसांत कर्जाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान
केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवी योजना सुरु केली आहे. पंतप्रधान रोजगार सृजन असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचा लाभ घेऊ शकता.
वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकते. मात्र, तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे नवा असला पाहिजे, ही पूर्वअट आहे. तुम्ही अगोदरपासूनच एखादा व्यवसाय करत असाल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतून कर्ज मिळणार नाही. तसेच पूर्वीपासून सरकारी अनुदांनाचा लाभार्थी असलेल्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
संबंधित बातम्या:
ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती
Akola DCC Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी