Aadhaar-Pan Linking : आधार-पॅन लिंक नाही केले तर जबरी भुर्दंड! इतका बसेल दंडम

Aadhaar-Pan Linking : आधार -पॅन कार्ड लिंक करण्याची डेडलाईन वाढून देण्यात आली आहे. पण या मुदतीनंतरही तुम्ही जोडणी केली नाही तर मोठा आर्थिक भुर्दंड बसेल.

Aadhaar-Pan Linking : आधार-पॅन लिंक नाही केले तर जबरी भुर्दंड! इतका बसेल दंडम
तर दंड
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक (Aadhaar-Pan Card) करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडणी आता 30 जून 2023 रोजीपर्यंत करण्यात येईल. पूर्वी ही मुदत 31 मार्च 2023 रोजीपर्यंत होती. सध्या तुम्ही 1000 रुपये दंड देऊन आधार-पॅनकार्ड लिंक करु शकता. पण 30 जूनपर्यंत हे दोन्ही कार्ड जोडले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. आता पाच वेळा संधी देऊनही आधार कार्ड-पॅन कार्डची जोडणी करण्यात आळस केला तर तुम्हाला जबरी दंड (Heavy Fine) सहन करावा लागेल. पॅन कार्डशिवाय तुम्हाला पुढील अनेक व्यवहार करता येणार नाही. तेव्हा जोडणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करा. दहा पटीत दंड भरण्यापेक्षा सध्या 1000 रुपये दंड जमा करणे आवश्यक आहे.

तर जबरी दंड

30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

या नियमानुसार जोडणी आवश्यक

आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

काय होईल परिणाम

डेडलाईनपर्यंत आधार-पॅनकार्ड लिकिंग नाही केले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्या नागरिकाला, करदात्याला आयकर रिटर्न फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तर त्याचा टॅक्स रिफंडही अडकून पडेल. तर त्याच्या दुसऱ्या आर्थिक व्यवहारांवर पण परिणाम होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाते उघडण्यास अडचण होईल. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉकमधील गुंतवणूक करणे अडचणीचे ठरेल.

हा पण दिलासा 

आधार कार्डधारकांसाठी ही आनंदवार्ता आली आहे. त्यानुसार, आधार कार्ड (Aadhaar Card) आणि निवडणूक ओळखपत्र जोडणीची (Voter ID) अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी आधार सोबत वोटर आयडी जोडण्याची मुदत देण्यात आली होती. पण अनेक नागरिकांनी ही मुदत वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता आधारसोबत निवडणूक ओळखपत्र जोडणी करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.