तुम्हाला देखील 25 लाखांचा ‘हा’ मेसेज आलाय? नेमकं सत्य काय जाणून घ्या

फसवणुकीसाठी आता व्हॉट्सअपचा कॉलचा (Whats app call) वापर करण्यात येत असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. व्हॉट्सअप वरुन ऑडिओ मेसेज (Audio Message) वेगाने व्हायरल होत आहे.

तुम्हाला देखील 25 लाखांचा ‘हा’ मेसेज आलाय? नेमकं सत्य काय जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:19 PM

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा (Technology)वापर वाढला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणुकीच्या नव्या घटनाही उघडकीस येत आहेत. विविध फंडे वापरुन आर्थिक आमिष दाखवून सर्वसामान्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते. लाखो-कोटी कमाईच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहनही पोलिसांच्या सायबर विभागाकडून वारंवार केलं जातं. दरम्यान, फसवणुकीसाठी आता व्हॉट्सअपचा कॉलचा (Whats app call) वापर करण्यात येत असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. व्हॉट्सअप वरुन ऑडिओ मेसेज (Audio Message) वेगाने व्हायरल होत आहे. फसवणूक करणारा ठग KBC कडून 25 लाखांची लॉटरी लागल्याचे भासवत आहे. आतापर्यंत अनेकांच्या नंबरवर हा मेसेज धडकला आहे. त्यामुळे तुम्हालाही अज्ञात नंबरवरुन मेसेज प्राप्त झाला असल्यास तत्काळ नंबरला ब्लॉक करा.

ऑडिओ मेसेजमध्ये नेमकं काय?

ऑडिओ मेसेजमधील व्यक्ती KBC चा कस्टमर ऑफिसर असल्याचा दावा करत आहे. राजीव शर्मा असे कथित व्यक्तीचे नाव आहे. मुंबई केबीसी कार्यालयातून फोन केल्याचे भासवत तुम्हाला केबीसीकडून 25 लाखांची लॉटरी मिळाल्याचे कॉलवरील व्यक्तीला सांगतो. केबीसीत पाच हजार व्यक्तींचे मोबाईल नंबर सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी कंपनीने पाच हजार व्यक्तींपैकी एका व्यक्तीची 25 लाखांच्या बक्षिसासाठी निवड केली. हा मेसेज फॉरवर्ड होणाऱ्या प्रत्येक मोबाईल धारकाला आपल्यालाच लॉटरी लागल्याचा भास होत आहे. त्यामुळे नजरचुकीने अकाउंट नंबर तसेच अन्य माहिती देण्याचा धोका निर्माण झाला आहे.

व्हॉट्सअपची कॉलची मागणी

ऑडिओ मेसेजमध्ये 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळविण्याची पद्धतही सांगितलेली आहे. कथित ऑडिओ मेसेजच्या फोटोत मॅनेजरचा नंबर आणि लॉटरीचा नंबर देण्यात आला आहे. सर्वप्रथम मॅनेजरचा फोन नंबर सेव्ह करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याला व्हॉट्सअप वरुन कॉल करायचा आहे. सर्वसाधारण कॉल केल्यास मॅनेजरशी संपर्क होणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअपद्वारेच संपर्क करण्याची गळ कथित मेसेजमधून घातली जात आहे.

आतापर्यंत अनेकांच्या नंबरवर हा मेसेज धडकला आहे. त्यामुळे तुम्हालाही अज्ञात नंबरवरुन मेसेज प्राप्त झाला असल्यास तत्काळ नंबरला ब्लॉक करा आणि संबंधित पोलीस स्थानकाकडे रीतसर तक्रारही नोंदवा. जेणेकरुन फसवणुकीच्या जाळ्यात अन्य कोणी व्यक्ती अडकणार नाही.

इतर बातम्या :

Punjab Election 2022 : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य, कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.