Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. डॉलरच्या किमतीमध्ये तेजी आल्याने आज सलग साहव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याच्या दरात 0.44 प्रति तोळा इतकी घसरण झाली तर चांदीच्या दरात (Silver Price) प्रति किलो 1.23 टक्क्यांची घसरण झाली.

Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव
सोन्या, चांदीचे आजचे दर
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:25 AM

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. डॉलरच्या किमतीमध्ये तेजी आल्याने आज सलग साहव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याच्या दरात 0.44 प्रति तोळा इतकी घसरण झाली तर चांदीच्या दरात (Silver Price) प्रति किलो 1.23 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या सहा दिवसांमध्ये सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1,600 रुपयांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 0.1 टक्क्यांची घसरण झाली असून, सोने 1,928.08 डॉलर प्रति औसवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे आंतराष्ट्रीय स्थरावर चांदीच्या दरात देखील घसरण पहायला मिळत असून, चांदीच्या दरात 0.2 टक्क्यांची घसरण झाली असून, चांदी 24.10 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48980 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीसाठी 66 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48980 रुपये आहेत, तर 24 कॅरट सोन्याचे दर 53 हजार 580 रुपये आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49 हजार 30 रुपये इतके असून, 24 कॅरट सोन्याचे दर 53 हजार 480 रुपये आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये प्रति तोळा 22 कॅरट सोन्याचा दर 49 हजार 30 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर 53 हजार 480 रुपये इतका आहे. तर चांदीचे दर प्रति तोळा 66 हजार 600 रुपये किलो आहेत. सोन्या-चांदीचे दर दिवसांतून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याचे दर हे सोने अधिक दागिन्याचे घडणावळ असे निश्चित केले जातात, त्यामुळे काही शहरांमध्ये सोन्याच्या दरात थोड्याफार फरकाने तफावत आढळते.

सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक

सोन्याच्या दरावर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यामधला प्रमुख घटक म्हणजे लवकरच अमेरिकेच्या जीडीपीचा डाटा समोर येणार आहे. आकडेवारी अपक्षेनुसार असल्यास सोने स्वस्त होऊ शकते. मात्र त्याचवेळी भारतात लगनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात भारतात सोन्याला मोठी मागणी असते, सोन्याची मागणी वाढल्याने भारतात सोन्याचे दर वाढू शकतात. तसेच रशिया आणि युक्रेयुद्ध सुरूच राहिल्यास त्याचा देखील मोठा परिणाम हा सराफा बाजारपेठेवर झाल्याचे पहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या

एकाच वर्षात महागाई दुप्पट; दोन अंकांचे शिखर केले सर, 1953 नंतर सहाव्यांदा तर 25 वर्षांतील पहिली बेसुमार वाढ

Today petrol diesel rate : सलग विसाव्या दिवशी भाव स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Stock Market : शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा उत्पन्न, जाणून घ्या पैसे कसे मिळवाल?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.