31 डिसेंबरच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

चालू वर्ष समाप्त होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. बँकिंग तसेच आर्थिक क्षेत्राशी संबंधित असे अनेक कामं असतात की जे पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर ही डेडलाईन असते. 31 डिसेंबरच्या आधी आपल्याला ती कामं पूर्ण करावीच लागतात.

31 डिसेंबरच्या आत पूर्ण करा 'ही' कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : चालू वर्ष समाप्त होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. बँकिंग तसेच आर्थिक क्षेत्राशी संबंधित असे अनेक कामं असतात की जे पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर ही डेडलाईन असते. 31 डिसेंबरच्या आधी आपल्याला ती कामं पूर्ण करावीच लागतात. अन्यथा मुदत संपल्यानंतर आपले नुकसान होऊ शकते. आज आपण अशाच काही महत्त्वपूर्ण कामांची यादी पाहणार आहोत. जी कामे आपल्याला 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करावीच लागणर आहेत. अन्यथा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

जीवन प्रमाणपत्र जमा करा

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2021 आहे. सरकारी निवृत्तीधारकांना दरवर्षी आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. हे प्रमाणपत्र जमा केल्यानंतरच पुढील वर्षी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो. जीवन प्रमाणपत्र जमा न केल्यास निवृत्ती वेतन रोखले जाते. त्यामुळे येत्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. विलंब झाल्यास तुमचे निवृत्ती वेतन मिळण्यास समस्या येऊ शकतात. तुम्ही घरी बसूल ऑनलाईन पद्धतीने देखील तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करु शकता.

इनकम टॅक्स रिटन दाखल करा

इनकम टॅक्स रिटन दाखल करण्यासाठी देखील 31 डिसेंबर 2021 ही शेवटी तारीख आहे. ज्या लोकांनी अद्यापही आपले इनकम टॅक्स रिटन दाखल केले नाहीत, त्यांनी येत्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत इनकम टॅक्स दाखल करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. साधारणपणे जुलै महिन्यापर्यंतच इनकम टॅक्स रिटन दाखल करता येतो. मात्र देशावर कोरोनाचे सावट असल्याने इनकम टॅक्स भरण्यासाठी मुदत वाढून देण्यात आली होती. करदात्यांना आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत इनकम टॅक्स दाखल करता येणार आहेत.

डिमॅट खात्याचे केवायसी

तुम्ही जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल, तुमचे डिमॅट खाते असेल आणि अजूनही तुम्ही तुमच्या खात्याचे केवायसी अपडेट केले नसतील तर आजच करून घ्या. कारण डिमॅट खात्याचे केवायसी अपडेट करण्याची शेवटीची तारीख ही 31डिसेंबर आहे. सेबी कडून डिमॅट खातेधारकांना केवायसी अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वी केवायसी अपडेट करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर होती. मात्र तारीख वाढून ती आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. जर 31 डिसेंबर नंतर देखील तुमच्या डिमॅट खात्याचे केवायसी अपडेट नसेल तर तुमचे खाते बंद पडू शकते.

संबंधित बातम्या

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.