आजच आपल्या वाहनाची टाकी करा फूल्ल; राज्यात पुढील दोन दिवस पेट्रोल, डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंप राहणार बंद?

राज्यात पुढील दोन दिवस पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच आपल्या वाहनाची टाकी करा फूल्ल; राज्यात पुढील दोन दिवस पेट्रोल, डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंप राहणार बंद?
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:11 PM

नवी दिल्ली : देशात महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा मिळावा. पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हावेत यासाठी केंद्राकडून दुसऱ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या एक्साइज ड्यूटीमध्ये (Excise Duty) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रापाठोपाठ केरळ, ओडिशा, महाराष्ट्र या राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात केली. एक्साइज ड्यूटी आणि व्हॅटमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जरी जनतेला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल पंप (Petrol Pump) चालक नाराज झाले आहेत. केंद्र सरकारने कोणतीही पूर्णकल्पना न देता पेट्रोल, डिझेलवरील एक्साइज ड्यूटी अचानक कमी केली. या निर्णयामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या (Petroleum Dealers Association) वतीने करण्यात आला आहे.

पेट्रोल पंप चालक केंद्राच्या निर्णयावर नाराज

पेट्रोल चालक मालक संघटनांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. केंद्रांच्या निर्णयामुळे मोठा फटका बसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्या मंगळवारी 31 मे रोजी पेट्रोल विक्रेत्यांकडून सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे. मंगळवारी पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारचा जो साठा शिल्लक राहिल तेवढाच मंगळवारी विक्री करण्यात येईल अंस पेट्रोल पंप चालकांनी म्हटले आहे. तर काही शहरात मंगळवारी पेट्रोल, डिझेलची विक्रीच न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या या आंदोलनात जवळपास सर्वच पेट्रोल पंप चालक-मालक सभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पेट्रोल विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

पेट्रोल पंप चालकांनी कमीशन वाढवण्याची मागणी केली आहे. पेट्रोल पंपचालकांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने अचानक एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही त्यामुळे आम्ही एक दिवस आधीच पेट्रोल, डिझेलचा मोठा स्टॉक खरेदी करून ठेवला होता. मात्र अचानक पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याने आम्हाला महाग इंधन स्वस्त दरता विकावे लागले. तसेच शेवटचे मार्जीन हे 2017 मध्ये वाढवण्यात आले होते, त्यानंतर पेट्रोल डिझेलवर मिळणाऱ्या मार्जीनमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. महागाई वाढत असल्याने मार्जीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दोन दिवस जाणून शकतो इंधनाचा तुटवडा

महाराष्ट्र आणि तामिळनाडू सोबतच अनेक राज्यातील पेट्रोल पंप चालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पेट्रोल खरेदी किंवा विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पेट्रोल स्टॉक खरेदी करणार नसल्याने दिवसभर इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो. तसेच मंगळवारी पेट्रोलची खरेदी न झाल्याने बुधवारी पेट्रोल शिल्लक नसणार त्यामुळे बुधवारी देखील पेट्रोल, डिझेलचा तुटवडा राहण्याचा अंदाज आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.