‘या’ सरकारी संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करा; केंद्र सरकारकडून 15 लाखांची ऑफर
Finance ministry | पहिल्या स्थानावरील व्यक्तीला पाच लाख रुपये, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या स्थानावरील व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ या स्पर्धेत एकूण नऊ विजेते निवडले जातील.
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून वेळोवळी अनेक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्यांना पारितोषिकही दिले जाते. आताही केंद्रीय अर्थमंत्रालयाने अशाच एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन या संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव मागवले आहेत. या तिन्ही गोष्टींसाठी प्रत्येक 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
बक्षीसाची रक्कम कशी मिळणार?
या स्पर्धेत लोगो, नाव आणि घोषवाक्य असे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागातून पहिल्या तीन क्रमांकाच्या व्यक्तींना बक्षीस दिले जाईल. पहिल्या स्थानावरील व्यक्तीला पाच लाख रुपये, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या स्थानावरील व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ या स्पर्धेत एकूण नऊ विजेते निवडले जातील.
DFI म्हणजे काय?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना डेवलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. या माध्यमातून योजनांसाठी निधी पुरवला जाईल. आगामी काळात मोदी सरकार पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज कसा पाठवाल?
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. याठिकाणी स्पर्धेचे नियम आणि अटीही वाचायला मिळतील. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करु शकता.
संबंधित बातम्या:
पीएम पीक विमा योजना: शेतकऱ्यांचे नुकसानाचे 2288.6 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित, नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार, यादीतील नाव असे तपासा