Financial Fraud : तुमच्या ही बँक खात्यातून पैसे झाले गायब? चिंता करू नका अशाप्रकारे थांबवा पुढील धोका

बँकेद्वारे कधीही कोणता मेसेज किंवा ईमेल द्वारे पाठवण्यात आलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करण्यास किंवा आपले कोणतेही पर्सनल तसेच बँकिंग डिटेल्स देण्यास सांगितले जात नाही. सायबर फ्रॉड (Cyber Fraud) रोखण्यासाठी सरकारने cybercrime.gov.in हे पोर्टल बनवलेले आहे.

Financial Fraud : तुमच्या ही बँक खात्यातून पैसे झाले गायब? चिंता करू नका अशाप्रकारे थांबवा पुढील धोका
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 6:07 PM

नवी दिल्ली : ज्या पद्धतीने काळानुसार तंत्रज्ञान प्रगतीशील होत आहे, त्याचबरोबर अनेक आर्थिक घोटाळे (Financial Fraud) झाल्याच्या घटना सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर हजारो, लाखो रुपयांना गंडवत सुद्धा आहेत. आपल्यापैकी अनेकांना बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. तसेच दुसरीकडे एखादी लॉटरी लागलेली आहे. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा सुद्धा मेसेज आपल्या मोबाईलवर येतो. अशा विविध प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते.  आपल्यापैकी अनेकजण असे सुद्धा आहेत की त्यांच्या बँकेच्या खात्यातून काही पैसे कमी झालेले आहे याची त्यांना माहिती सुद्धा नसते, जेव्हा हे लोक आपल्या बँकेमध्ये पासबुक एन्ट्री करण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपल्या खात्यातून काही पैसे कमी झाले आहेत.

जर तुमच्या सोबत एखादा आर्थिक घोटाळा झाला असेल तर अशावेळी  सर्वात आधी आपल्या बँकेला याबद्दल कळवायला हवे. अशा प्रकारची कुठलीही घडलेली घटनाबद्दलची माहिती बँकेला 24 तासाच्या आत देणे अनिवार्य आहे. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून बँकेच्या प्रतिनिधींना याबद्दलची सविस्तर माहिती देऊ शकता आणि तुमची तक्रार रजिस्टर करू शकता. किंवा थेट तुम्ही बँकेमध्ये जाऊन बँकेच्या प्रतिनिधींना घडलेली घटना सविस्तर पणे सांगून योग्य ती तक्रार सुद्धा करू शकतात. जर तुमच्या बँकेच्या खात्यातून फसवणुकी द्वारे काही रक्कम काढली गेली असेल तर याबाबत तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करू शकतात अशा प्रकारच्या सगळ्या घटना सायबर सेल अंतर्गत यांचा समावेश केला जातो.

जर तुमची चूक नसेल तर 72 तासाच्या आत मध्ये मिळू शकते रक्कम

कायदे सल्लागार आणि सायबर तज्ञ वीराग गुप्ता यांच्या मते जर तुमच्या बाबतीत असे काही घडले तर अशावेळी बँकेला त्वरित कळवायला हवे आणि अशा प्रकारच्या ट्रांजेक्शन मध्ये जर बँक ग्राहकाची कोणत्याही प्रकारची चूक नसेल तर अशावेळी 72 तासाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये पैसे परत करते. सायबर एक्सपर्ट पवन दुगल यांच्यामते सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारने एक तक्रार करण्यासाठी आवश्यक पोर्टल सुद्धा बनवलेले आहे त्या पोर्टलचे नाव cybercrime.gov.in आहे. या पोर्टल वर ऑनलाईन फ्रॉडची तक्रार करू शकतो याशिवाय सायबर क्राईम बद्दल हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे. 155260 या नंबर वर सुद्धा आपण तक्रार करू शकतो.

ओटीपी शेअर करू नका

जर एखाद्याने फ्रॉड करण्यासाठी ओटीपी जनरेट केला आणि खातेधारकाने त्या व्यक्तीच्या जाळ्यामध्ये फसून जर आपला ओटीपी नंबर सांगितला असेल तर ही संपूर्ण चूक खातेधारकाची असते अशा मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची कोणतीही जबाबदारी बँक घेत नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर पद्धतीने ग्राहकाच्या खात्यातून काही ट्रांजेक्शन केले असतील किंवा एखादे एटीएम कार्ड हॅक करून त्यातून पैसे काढले असेल अश्या प्रकरणात ग्राहकाची कोणत्याही प्रकारची भूमिका नसते किंवा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल तर अशावेळी ग्राहकाची चूक मानली जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने तुमची बनावट सही करून एखादा विड्रोव चेकवर बनावट सही केली असेल व या चुकीच्या मार्गाने तुमच्या बँकेतून तुमच्या खात्यातून पैसे काढले असेल तर अशावेळी तुम्ही बँक मॅनेजरला याबद्दलची माहिती देऊन संबंधित घटनेबद्दल पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करू शकतात.

संबंधित बातम्या

आता QR कोडच्या मदतीने ओळखा खरी आणि बनावट औषधे, लवकरच नवीन नियम लागू होणार

चुकवाल तर फसाल: EMI वेळेवर भरणं का हिताचं? जाणून घ्या- तज्ज्ञांचं मत

Dolo 650 : कोरोनाच्या लसी इतकीचं डोलो-650 ची चर्चा, कंपनीनं काय प्लॅनिंग केलं, मायक्रो लॅब्सचे MD म्हणाले…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.