Financial Tips : पहिल्या नोकरीतील ‘या’ चुका टाळा आणि व्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम

Financial Tips : आपली पहिली कमाई अत्यंत खास असते. अनेकांनी पहिल्या कमाईतून मिळालेल्या रकमेला कसे खर्च करायचे याचे नियोजनदेखील केले असते. परंतु तुम्ही वायफळ खर्च न आर्थिक शिस्त लावत काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यातील अडचणींपासून दूर राहाल.

Financial Tips : पहिल्या नोकरीतील ‘या’ चुका टाळा आणि व्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी टीप्स/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 2:23 PM

Financial Tips : पहिल्यांदाच नोकरी मिळाल्याचा आनंद अत्यंत मोठा असतो. आर्थिकदृष्ट्या आपण आपल्या पायावर उभे राहिलो ही भावना अत्यंत समाधानाची असते. विशेषकरून भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलादेखील मोठ्या संख्येने पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. नोकरी मिळाल्यानंतर अनेकांकडून आपले आर्थिक नियोजन (Financial management) केले जात असते. हे नियोजन अचूक असल्यास भविष्यात आपणास कुठल्याही पायरीवर आर्थिक अडचण सहन करावी लागत नाही. या लेखात आपण ‘वुमन मिलेनियल्स’साठी काही महत्त्वपूर्ण ‘फायनान्शिअल टिप्स’वर (Financial Tips) चर्चा करणार आहोत. अनेकदा कामाचा अनुभव नसेल तर अनेकवेळा नोकरीवर रुजू होताना पगाराचा मोठा भाग ‘व्हेरिएबल’ म्हणजेच बदलता, चल म्हणून ठेवला जातो, ज्यामुळे प्रत्यक्ष हातात येणारा पगार कमी होतो. कंपनीची कामगिरी, कर्मचारीची कामगिरी, कंपनीचा नफा, आर्थिक कामगिरी यासह अनेक गोष्टींवर ‘व्हेरिएबल्स’ अवलंबून असतात. कोरोना (Corono) महामारीमध्ये, बहुतेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘व्हेरिएबल्स’चा लाभ दिला नाही. परिणामी पगारातील व्हेरिएबल्सचा वाटा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

1) मनी कंट्रोलमध्ये प्रकाशित अहवालात बँक बाजारच्या चीफ प्रोडक्ट अधिकारी रती शेट्टी यांनी सांगितले, की नोकरीचे ऑफर लेटर मिळाल्यावर सर्वप्रथम ‘व्हेरिएबल्स’घटक किती आहे हे तपासा. त्याला कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘व्हेरिएबल्स’मध्ये घट झाल्यामुळे हातात येत असलेला पगार वाढेल. हे विशेषतः फ्रेशर्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण पे-आउट आपल्या कामाच्या आधारावर आहे. फ्रेशर्सकडे अनुभवाची कमतरता असते, त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

2) जर तुमचा मूळ पगार वाढला तरच भविष्य निर्वाह निधीतील तुमची कपात जास्त असेल. यामुळे हातात येत असलेला पगार कमी दिसेल. त्यामुळे मालकाकडे मूळ वेतन कमी करण्याची मागणी करावी

3) आपत्कालीन निधीत 4-6 महिन्यांचा खर्च अपेक्षित असतो. नोकरी लागल्यावर सर्वप्रथम स्वत:साठी आपत्कालीन निधी तयार करा. अचानक नोकरी गेल्यास किंवा इतर कोणत्याही आर्थिक परिस्थितीत हा निधी आवश्‍यक असतो. हा निधी तयार करण्यापूर्वी, महिन्याचा किमान आवश्यक खर्च किती आहे याचा शोध घ्यावा. नोकरीच्या सुरुवातीला महिन्याचा खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

4) आपल्या कमाईनुसार महिन्याला जमाखर्चाची नोंद करणे गरजेचे आहे. महिन्याचा खर्च तुमच्या कमाईपेक्षा जास्त नसावा. जर तुम्हाला जास्त खर्च करण्याची सवय लागली तर तुम्ही नेहमी अडचणीत सापडाल.

5) मिलेनियल्स महिलांनी नोकरी जॉइन करताना, पगाराची हातात येणारी रक्कम वाढवण्याबाबत मालकाशी चर्चा केली पाहिजे. मूळ वेतन कमी करा आणि ‘व्हेरिएबल्स’किमान ठेवा. जर तुम्ही कर्ज घेऊन अभ्यास केला असेल तर सर्वप्रथम शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीवर लक्ष केंद्रित करायला हवे.

6) पुढील शिक्षण पूर्ण करायचे असेल तर पगारातील काही भाग उच्च शिक्षणासाठी ठेवा. यासाठी एसआयपीच्या मदतीने अल्पकालीन गुंतवणूकही करता येते. अभ्यासाव्यतिरिक्त जर तुमचा विवाह किंवा परदेश दौरा असे नियोजन असेल तर, यासाठी काही फंड तयार करावा.

7) नोकरी सुरू केल्यावर, तुमच्या भविष्यासाठी दरमहा किमान 1000 रुपये ठेवा. जर तुम्हाला फायनांशियल माहिती नसेल, तर पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे ते शिका आणि आर्थिक निर्णय संपूर्ण विचारपूर्वक घ्या

8) तुम्ही कमाई सुरू करताच स्वत:चा हेल्थ विमा उतरवा. अनेक ठिकाणी नोकरीसोबतच हेल्थ विमाची तरतुद केली जाते. परंतु त्याचे विमा कवच पुरेसे नसल्यास अतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करावा. स्वतःचे संरक्षण केल्यानंतर, तुमच्या कुटुंबासाठीही आरोग्य विमा काढून घ्या. सोबत टर्म इन्शुरन्सही महत्त्वाचा आहे.

9) तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आणि तुमचे महिन्याचे बजेट तपासा. महिन्याचा लेखाजोखा ठेवा. पैसे नसताना खरेदी करणे टाळावे. नोकरीच्या सुरुवातीला क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. यामुळे, ईएमआयचा त्रास होणार नाही आणि तुमचे ‘मनी मॅनेजमेंट’ चांगले राहील.

आणखी वाचा :

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम, अटी व व्याजदर…

डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट

IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.