तुमच्या आधार कार्डवरुन दुसर्या कोणी सिमकार्ड खरेदी केलंय का? असे करा चेक
बऱ्याचदा आपण एकच सिमकार्ड विविध मोबाईल सिम कंपन्यांसोबत पोर्ट करतो. तर अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या आधार कार्डद्वारे कुटुंबातील इतर व्यक्ती सिम कार्ड घेतात.
मुंबई : एका आधारकार्डवर किती सिमकार्ड खरेदी करता येतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पण हा खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा आपण एकच सिमकार्ड विविध मोबाईल सिम कंपन्यांसोबत पोर्ट करतो. तर अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या आधार कार्डद्वारे कुटुंबातील इतर व्यक्ती सिम कार्ड घेतात. पण अशावेळी एका आधारकार्डवर किती सिम खरेदी करता येतात, त्याची मर्यादा किती याची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या आधारकार्डवर इतर कोणी सिम कार्ड घेतलं आहे की नाही याचीही माहिती असणे गरजेचे आहे. (Find Details of Mobile SIM purchased by Aadhaar Card Number Know The details)
एका आधारकार्डवर किती सिमकार्ड खरेदी करता येतात?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आधार कार्डावर जास्तीत जास्त 18 सिम कार्ड काढता येतात. त्यामुळे तुमच्या आधारकार्डवर कोणी किती सिमकार्ड खरेदी केले आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. अनेकदा आधार क्रमांकाचा गैरवापर करुन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड घेतल्याच्या तक्रारीही दाखल केल्या जातात. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड आहे याची माहिती शोधणे हा आहे.
TRAI चा नियम काय?
यापूर्वी एका आधार कार्ड क्रमांकावरुन 9 सिमकार्ड काढण्याचा नियम होता. त्यानंतर ही मर्यादा वाढवून 18 करण्यात आली. आता एका आधार क्रमांकावरून 18 सिमकार्ड खरेदी करता येतात. TRAI कडून हा नवा नियम तयार करण्यात आला आहे.
अनेकदा व्यवसायाच्या उद्देशाने काही जणांना एकाचवेळी अनेक सिमकार्ड घेणे आवश्यक असते. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या सिमकार्डची संख्या 9 वरुन 18 करण्यात आली आहे.
त्यामुळे एका आधारकार्डवरुन किती सिमकार्ड काढता येऊ शकतात, याची माहिती तुम्हालीही सहज मिळवता येते. पण त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधारकार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक केला नसेल तर तुम्हाला ते काम सर्वात आधी करावे लागेल.
अशी मिळवा माहिती?
- तुमच्या आधारकार्डद्वारे किती सिमकार्ड आहे, याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथमUIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉगिन करावे लागले.
- यावर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवर Get Aadhaar असा ऑप्शन मिळेल
- त्याखाली तुम्हाला Download Aadhar असा एक ऑप्शन दिसेल.
- या ऑप्शनच्या खाली दिसणाऱ्या View more नावाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर Aadhaar online services वर क्लिक करुन Aadhaar authentication history या ऑप्शनवर क्लिक करा.
- Where can a resident check/Aadhaar authentication यावर क्लिक करुन त्याठिकाणी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर एक वेगळी स्क्रिन ओपन होईल. त्यात तुम्ही तुमचा आधारकार्ड नंबर, captcha कोड आणि send OTP या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर authentication type मध्ये All हा ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यात आपण आधारकार्डशी जोडलेल्या सिमकार्डचा तपशील आवश्यक असलेली तारीख भरावी लागेल.
- त्यानंतर प्रथम आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो त्या ठिकाणी भरा. त्यानंतर verify OTP वर क्लिक करा
- त्यानंतर एक नवीन स्क्रिन तुमच्या समोर ओपन होईल
- त्यात तुम्हाला आधारकार्डशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
(Find Details of Mobile SIM purchased by Aadhaar Card Number Know The details)
संबंधित बातम्या :
पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी थेट तेल उत्पादक देशांशी साधला संपर्क
बनावट सिमकार्डांद्वारे फसवणूक करणे कठीण, सरकारकडून केंद्रीय डेटाबेस तयार, नवीन यंत्रणा सज्ज
PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट