AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital : रुपयाचे डिजिटल रुपडे फार्मात, आजपासून सुरुवात..फायद्याचे गणित तर समजून घ्या..

Digital : रुपयाचे डिजिटल रुपडे सध्या फार्मात आले आहे. डिजिटल इंडियाचा डिजिटल रुपया बाजारात दाखल झाला आहे.

Digital : रुपयाचे डिजिटल रुपडे फार्मात, आजपासून सुरुवात..फायद्याचे गणित तर समजून घ्या..
डिजिटल रुपया आला होImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 2:39 PM

नवी दिल्ली : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज मंगळवारी, 1 नोव्हेंबर रोजी भारताची पहिली डिजिटल करन्सी (Digital Currency) बाजारात दाखल झाली आहे. अर्थात दाखल झाली आहे, म्हणजे हे काही भौतिक चलना नाही. तर रुपया डिजिटल (Digital Rupee) स्वरुपात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तो खिश्यात बाळगण्याची गरज उरली नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पहिल्या भारतीय डिजिटल चलनाचे, डिजिटल रुपयाची (Digital Rupee) पहिली पायलट चाचणी आजपासून सुरु केली. 1 नोव्हेंबरपासून आरबीआयने याचा वापर सुरु केला.

सध्या ग्राहकत या डिजिटल करन्सीचा वापर सरकारी सुरक्षित व्यवहारात करु शकतात. सरकारी सुरक्षित व्यवहारातील दुय्यम व्यवहार डिजिटल रुपयामार्फत पूर्ण केले जातील, असे RBI ने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

या प्राथमिक चाचणीत भाग घेण्यासाठी आरबीआयने देशातील काही बँकांना आमंत्रण दिले. या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक (SBI), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक, यस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश आहे.

RBI यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी, विशिष्ट समुहातंर्गत डिजिटल रुपयांचे परिक्षण करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या एका महिन्यातच हा पायलट प्रयोग राबविण्यात येणार आहे.

चलनाचे इलेक्ट्रॉनिक्स रुप म्हणजे डिजिटल करन्सी आहे. डिजिटल मनी, इलेक्ट्रॉनिक मनी, इलेक्ट्रॉनिक करन्सी, सायबर कॅश असे या चलनानाला नावे आहेत.

तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, देशात आता युपीआयमुळे मोफत व्यवहाराची प्रक्रिया झटपट होत आहे. डिजिटल करन्सीमुळे त्याला आणखी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे वेळेसह खर्चाची बचत होईल.

भारताच्या डिजिटल करन्सीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रुपयाला आपोआप मोठा दर्जा प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय व्यवहार भारतीय रुपयात करणे सोपे होईल. खर्च आणि वेळेची बचत होईल.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.