ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुरक्षित गुंतवणुकीच्या 5 योजना, जाणून घ्या सर्वकाही

Senior Citizens | ज्येष्ठ नागरिक चांगल्या परताव्यासोबतच सुरक्षित गुंतवणुकीलाही तितकेच प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत पाच आर्थिक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि चांगले उत्पन्न मिळवून देण्याचा मार्ग ठरू शकतात.

ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुरक्षित गुंतवणुकीच्या 5 योजना, जाणून घ्या सर्वकाही
पेंशन योजनेमधील गुंतवणुकीत लोकांचा कल वाढला; एनपीएसमध्ये 24 टक्के वाढ
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:54 AM

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने रेपो रेटमध्ये कपात केली जात आहे. अशातच बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याजदर (Intrest Rates) मिळवून देणाऱ्या योजनाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक चांगला व्याजदर देणाऱ्या पर्यायी योजनांच्या शोधात आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिक चांगल्या परताव्यासोबतच सुरक्षित गुंतवणुकीलाही तितकेच प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत पाच आर्थिक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि चांगले उत्पन्न मिळवून देण्याचा मार्ग ठरू शकतात.

1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)

Senior Citizen Saving Scheme ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी योजनात आहे. यामध्ये तुम्ही कितीही खाती उघडून गुंतवणूक करु शकता. मात्र, SCSS योजनेतंर्गत एकूण गुंतवणुकीसाठी 15 लाखांची मर्यादा आहे. केंद्र सरकार या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत निश्चित करते. सध्याच्या एप्रिल-जून तिमाहीत SCSS योजनेचा व्याजदर 7.4 टक्के इतका आहे. तुम्ही या योजनेत एकदा पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला पाच वर्ष व्याज मिळत राहते. मात्र, हे उत्पन्न करपात्र असते.

2. पोस्ट कार्यालय मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)

POMIS या योजनेचा कालावधीही पाच वर्षांचा आहे. त्यामुळे पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहते. सध्याच्या एप्रिल-जून तिमाहीत POMIS योजनेचा व्याजदर 6.6 टक्के इतका आहे. तुम्ही या योजनेत एकाच खात्यातून जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. तर एकूण गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये इतकी आहे. तुम्हाला गुंतवलेल्या पैशांवर महिन्याला व्याज मिळते.

3. प्रधानमंत्री वय वंदन योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)

सध्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट आणि निवृत्ती वेतन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक व्याज मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या योजनेच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. सध्या या योजनेचा व्याजदर आठ टक्क्यांवरून घसरुन 7.4 टक्क्यांवर आला आहे. तर, वार्षिक निवृत्ती वेतनाची पर्याय निवड केल्यास 7.66 टक्के वार्षिक परतावा मिळेल.

वयोवृद्धांना निवृत्ती वेतनासाठी वय वंदना योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. दरवर्षी 1 एप्रिलला सरकारच्या या योजनेच्या परताव्याचा आढावा घेऊन फेरबदल करते. मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निवृत्तीवेतन घेतले जाऊ शकते. नव्या सुधारणांनंतर ग्राहकांना दर महिना 1000 च्या निवृत्तीवेतनासाठी किमान 1.62 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक पेन्शनसाठी 1.61 लाख, सहा महिन्यांच्या पेन्शनसाठी 1.59 लाख आणि वार्षिक निवृत्तीवेतनासाठी किमान 1.56 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

4. फ्लोटिंग रेटस सेव्हिंग बाँडस (Floating Rate Savings Bonds)

फ्लोटिंग रेटस सेव्हिंग बाँडस योजनेचा कालावधी 7 वर्षांचा आहे. या योजनेचा व्याजदर सहा महिन्यांनी बदल राहतो. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला 1 जानेवारी आणि 1 जुलै अशा दोन हप्त्यात व्याजाचे पैसे मिळतात. सध्याच्या घडीला या योजनेचा व्याजदर 7.15 टक्के इतका आहे. या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्याद नाही. मात्र, या योजनेतून मिळणारे उत्पन्न करपात्र असते.

5. मुदत ठेव (Fixed Deposites)

बँकामधील मुदत ठेवी हा आजपर्यंत गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय पर्याय राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये व्याजदर घटल्यामुळे या योजनांची लोकप्रियता घटली आहे. सध्याच्या घडीला ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरिकांसाठी SBI, ICICI, HDFC आणि बँक ऑफ बडोदामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. गेल्यावर्षी मे महिन्यात या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनांमध्ये 30 जूनपर्यंतच गुंतवणूक करता येऊ शकते.

संबंधित बातम्या:

फिक्स डिपॉझिटवर ‘या’ 4 बँका देतायत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या खास ऑफर

PM Vaya Vandana Yojana | फक्त एकदा करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळेल निश्चित पेन्शन

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.