AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Account Closed | बचत खाते बंद करायचे? या गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर रक्कम अडकलीच म्हणून समजा

Account Closed | तुमच्याकडे एकापेक्षा अधिक बचत खाते असतील तर अधिकची खाते बंद करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर खात्यातील ठेवी अडकतील

Account Closed | बचत खाते बंद करायचे? या गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर रक्कम अडकलीच म्हणून समजा
बँक खाते बंद करायचेय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 8:10 AM

Account Closed | सध्या ऑनलाईन बँक खाते (Online Bank Account) उघडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच ही प्रक्रिया ही अत्यंत सोपी असल्याने सहज बँक खाते उघडल्या जाते. पण एकापेक्षा अधिक बँक खाते असल्यास आणि अधिकची खाते बंद (Account Closed) करायची असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर जुने खाते तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. नवीन खाते उघडण्यापूर्वी तुम्ही एक चेकलिस्ट(Checklist) तयार करा. ज्यामध्ये जुने बचत खाते (Saving Account) बंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असेल.  नाहीतर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.  चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खाते बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1 स्वयंचलित पेमेंट करा रद्द

बचत खाते बंद करण्यापूर्वी, सर्व स्वयंचलित पेमेंट एकदा तपासा आणि ते बंद करा. त्यामुळे ऑटो डेबिटचा पर्याय आपोआप बंद होईल. तसेच नवीन खाते उघडताना जो अर्ज सादर कराल, त्यात ऑटोमेटेड पेमेंटचा पर्याय स्वीकारा अथवा तो स्थगित करा. ऑटोमेटेड पेमेंटमुळे तुमची बिले अगदी वेळच्यावेळी आपोआप भरली जातात. जर तुम्ही जुने खाते नवीन खात्यात हस्तांतरित न करता बंद केले तर बिल भरण्यात अडचण येऊ शकते.

हे सुद्धा वाचा

2 सर्व स्टेटमेंटचा बॅकअप घ्या

बचत खाते बंद करण्यापूर्वी, एकदा सर्व स्टेटमेंटचा बॅकअप घ्या. बँक स्टेटमेंटची गरज आहे का नाही हे ठरवण्याची गरज नाही. कारण अचानक एखाद्या व्यवहाराबाबत माहिती हवी असल्यास हा व्यवहार तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये सापडू शकेल. पुन्हा अशा व्यवहारावरुन गोंधळ उडाल्यास हा स्टेटमेंटचा बॅकअप उपयोगी ठरेल. या स्टेंटमेंटची तुम्ही प्रिंटआऊट घेऊ शकता अथवा त्याची स्फॉट कॉपी जनत करु शकता.

3 नवीन खाते उघडा

जर तुमच्याकडे अधिक बचत खाते नसेल तर जुने खाते बंद करू नका. जर जास्तीचे बचत खाती असतील तर जुने खाते बंद करण्यापूर्वी नवीन उघडा. डेबिट कार्ड, चेकबुक मिळेपर्यंत संपूर्ण पैसे त्या खात्यात एकाच वेळी जमा करू नका. जोपर्यंत तुम्हाला रक्कम काढण्यासाठी बँक डेबिट कार्ड, नेटबँकिंगचा पर्याय देत नाही, तोपर्यंत नवीन खात्यात सर्व रक्कम जमा करु नका.

4 शिल्लक तपासून घ्या

खात्यात शिल्लक नसेल तर खाते बंद करताना तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. बँक शिल्लक न ठेवल्याप्रकरणी दंड वसूल करेपर्यंत खाते बंद करू देणार नाही. कोणतेही खाते मायनसमध्ये असेल तर जोपर्यंत दंडासह किमान मासिक शिल्लक ठेवली जात नाही. तोपर्यंत खाते बंद करता येणार नाही. त्यामुळे खाते बंद करण्यापूर्वी शिल्लक तपासून घ्या. सर्व शुल्क भरून खाते सक्रिय करा, नंतर ते बंद करा.

5 खाते क्रमांक अपडेट करा

जर तुम्ही जुने खाते बंद करून नवीन खाते उघडले असेल, तर सर्वात अगोदर तुमचा खाते क्रमांक तुम्ही कुठे कुठे दिला आहे ते तपासा. जसे कंपनीत पगारासाठी, आयटीआरमध्ये, गॅस एजन्सीमध्ये यापैकी ज्याठिकाणी तुम्ही खाते क्रमांक दिला असेल त्याठिकाणी तो तुम्हाला अद्ययावत करावा लागेल. तुमचे खाते या ठिकाणी नियमितपणे वापरले जाते, त्यामुळे नवीन खाते क्रमांकाची माहिती या सर्व ठिकाणी तुम्हाला अद्ययावत करावी लागेल.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....