फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा

Fixed Deposit | तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटवर कर्जही घेऊ शकता. तुमची पॉलिसी तारण म्हणून ठेवली जाते. त्यामुळे FD करताना त्यावर कर्ज घेऊ शकता की नाही, हे तपासून पाहावे. अनेक बँका फिक्स्ड डिपॉझिटमधील रक्कमेच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना 'या' चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
मुदत ठेव
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 6:46 AM

मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposite Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात.फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. मात्र, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान बाळगले पाहिजे.

मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना किती व्याज मिळणार, याची योग्य ती माहिती घ्यावी. सध्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वसाधारणपणे 6 ते 7 टक्के इतके व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या तुलनेत 0.25 टक्के अधिक व्याज मिळते. मुदत ठेव योजनेत एकदा पैसे गुंतवले तर ते योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत काढता येत नाहीत. तुम्हाला मुद्दल रक्कम आणि व्याजाचे पैसे एकत्रच मिळतात. तर नॉन- क्युमिलेटिव्ह मोडमध्ये तुम्हाला मुदत ठेवीचे व्याज प्रत्येक महिन्यालाही मिळू शकते.

तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटवर कर्जही घेऊ शकता. तुमची पॉलिसी तारण म्हणून ठेवली जाते. त्यामुळे FD करताना त्यावर कर्ज घेऊ शकता की नाही, हे तपासून पाहावे. अनेक बँका फिक्स्ड डिपॉझिटमधील रक्कमेच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना व्याजदर हाच एकमेव निकष ठेवू नका. जास्त व्याजाच्या हव्यासापोटी कोणतीही पतपेढी किंवा लहानसहान बँकेत पैसे गुंतवू नका. त्यासाठी चांगले रेटिंग असलेल्या पतपेढी आणि बँकांची निवड करा.

Canara आणि IDBI बँकेने व्याजदर बदलले

कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँकेने त्यांचे व्याजदर बदललेत. कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँकेने मुदत ठेवींचे दर बदललेत. कॅनरा बँकेने सांगितले आहे की, जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी FD केली तर तुम्हाला 5.25 टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही पाच वर्षे ते 10 वर्षे मुदत ठेव केली तर तुम्हाला 5.25 टक्के व्याज मिळेल. कॅनरा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदर बदललाय. हा नवीन नियम 8 ऑगस्ट 2021 पासून लागू आहे. बँकेने जवळजवळ सर्व एफडी योजनांवरील व्याजदर कमी केलेत. केवळ 46 ते 90 दिवसांच्या परिपक्वता असलेल्या एफडी योजना वजावटीच्या बाहेर ठेवल्या जातात.

नवीन बदलानुसार, कॅनरा बँक 7-45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 2.90 टक्के व्याज देत आहे. 46-90 दिवस FD योजना, 91-179 दिवस FD आणि 180 दिवस ते 1 वर्ष FD योजना, कॅनरा बँक अनुक्रमे 3.9, 3.95 आणि 4.40 टक्के व्याज देत आहे. कॅनरा बँक एक विशेष योजना चालवते, जी कॅनरा युनिक 1111 दिवस म्हणून ओळखली जाते. यामध्ये जर तुम्ही 2 कोटींपेक्षा कमी एफडी केली तर तुम्हाला 5.35 टक्के व्याज मिळेल. या विशेष योजनेत ग्राहकाला 1111 दिवसांसाठी FD मिळवावे लागते.

त्याचप्रमाणे दुसऱ्या सरकारी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर बदललेत. ही बँक IDBI बँक आहे. या बँकेचा नवीन दर 16 ऑगस्ट 2021 पासून लागू आहे. या अंतर्गत 7 दिवस ते 10 वर्षांच्या परिपक्वता असलेल्या सर्व मुदत ठेवींचा समावेश करण्यात आलाय. त्यात फक्त त्या एफडींचा समावेश आहे, ज्यांच्या ठेवी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. 0-6 दिवसांच्या FD मध्ये यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या : 

बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज मिळवायचंय, मग ‘हा’ पर्याय उत्तम

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? व्याजदर किती, जाणून घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.