घर खरेदी करू इच्छिनाऱ्यांसाठी मोठा धक्का; एकाच आठवड्यात एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा होम लोनच्या व्याज दरात वाढ
घर खरेदी करू इच्छिनाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसीकडून एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा होम लोनच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसीने व्याज दर 30 बेसिस पॉइंटने वाढवण्याची घोषणा केली आहे.
घर खरेदी करू इच्छिनाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एकाच आठवड्यात एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा होम लोनच्या (HDFC Home Loan) व्याज दरात (interest rates) वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. एचडीएफसीकडून व्याज दरात 30 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. नवे व्याज दर हे येत्या 9 मे पासून लागू होणार आहेत. आता बँकेच्या होम लोनवर (Home Loan) आकारण्यात येणारा कमीत कमी व्याज दर हा सात टक्क्यांवर पोहोचला आहे. एक मे रोजी एचडीएफसीने आपल्या होम लोनमध्ये पाच बेसीस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे व्याज दर वाढून 6.75 टक्क्यांवर पोहोचला होता. आता त्यामध्ये पुन्हा एकदा 30 बेसीस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बँकेचा व्याजदर हा 7.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता होम लोन घेतल्यास ईएमआयमध्ये देखीव वाढ होणार आहे. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोर हा 750 हून अधिक असेल त्याना बँकेकडून 7. 5 टक्क्याने लोन मिळू शकते. तुम्हाला होम लोन हे किती व्याज दराने मिळणार हे तुमच्या क्रेडिट स्कोरवरून ठरत असते.
एक मेला पाच बेसिस पॉइंटची वाढ
एचडीएफसी बँकेने एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा होमलोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. एक मेला बँकेने व्याज दरात पाच बेसीस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी बँकेचा होम लोनवरील व्याज दर हा 6.70 इतका होता. बँकेने व्याज दरात पाच बेसीस पॉइंटची वाढ केल्याने व्याज दर 6.75 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा बँकेने आता व्याज दरात 30 बेसीस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने होम लोनवरील व्याज 30 बेसीस पॉइंटने वाढवल्याने आता होम लोनचे व्याज दर 7.5 टक्क्यांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ आता ग्राहकांना बँकेकडून कमीत कमी 7.5 टक्के दराने गृहकर्ज मिळू शकते. मात्र त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर देखील महत्त्वाचा असणार आहे.
अनेक बँकांनी वाढवले होम लोनचे व्याज दर
दरम्यान केवळ एचडीएफसी बँकेनेच नाही तर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होम लोन आणि इत लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाकडून होम लोनच्या व्याज दरात 40 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. तर आयसीआयसीआय बँकेने होम लोनच्या व्याज दरात 45 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. पूर्वी आयसीआयसीआयचे कर्ज हे 7.10 टक्क्यांनी मिळायचे आता त्यावर बँकेकडून 7.55 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.