AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Insurance : PF खात्यावर मिळतो मोफत विमा! पण तुम्ही केलं का हे काम

EPFO Insurance : पीएफ खातेदारांना मोफत विम्याचा लाभ मिळतो. हा विमा भरभक्कम आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना मोठी आर्थिक मदत मिळते. वारसांची ससेहोलपट थांबते.

EPFO Insurance : PF खात्यावर मिळतो मोफत विमा! पण तुम्ही केलं का हे काम
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:24 PM

नवी दिल्ली : भविष्यातील जोखीम टाळण्यासाठी, आपल्या पश्चात कुटुंबियांची ससेहोलपट थांबण्यासाठी आपण जीवन विमा पॉलिसी (Life Insurance) खरेदी करतो. तर गृह विमा, आरोग्य (Health), ट्रॅव्हल विमा काढता येतो. पण असा एक विमा आहे, जो तुम्हाला मोफत मिळतो. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना केंद्र सरकार हे विमा संरक्षण देते. नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते. त्यांना मोफत विमा मिळतो. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत हा विमा मिळतो. त्यासाठी पीएफ सदस्यांना कोणतेही शुल्क, हप्ता जमा करावा लागत नाही. ही योजना एकदम निःशुल्क आहे. पण त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्हाला वारसदाराचे नाव पीएफ खात्यात जोडावे लागते. तरच या विम्याचा लाभ मिळतो.

ईपीएफओ हा विमा EDLI अंतर्गत देण्यात येतो. या योजनेतंर्गत सदस्याच्या वारसाला 2.5 लाख ते 7 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या योजनेतंर्गत जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्याचा (Members) अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना (Heirs) आर्थिक मदत देण्यात येते. 1976 पासून ही योजना लागू आहे. त्यामुळे संकटाच्या काळात या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळतो.

काय आहे योजना

हे सुद्धा वाचा

EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो. या विमा योजनेत (Employees Deposit Linked Insurance) वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. या योजनेसाठी सदस्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. त्यासाठी तुमची कंपनी योगदान देते. त्यासाठी कर्मचाऱ्याला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

कसा करावा दावा

जर कर्मचाऱ्यांचा, सदस्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना विम्याचे संरक्षण मिळते. ते विम्यासाठी दावा दाखल करु शकतात. त्यासाठी वारसदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्कासंबंधीचे कागदपत्रे सादर करावे लागतील.

EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे

  1. सदस्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
  2. 12 महिने नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
  3. EPFO सदस्याला EDLI योजनेत नोकरीत असेपर्यंतच फायदा मिळतो.
  4. सेवेत नसताना वारसदारांना विमा योजनेत दावा दाखल करता येत नाही.
  5. विम्याची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात येते.

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.