IPPB : पोस्टाची बँक आता तुमच्या दारी! मिळतील सर्व सुविधा, करावे लागेल हे काम

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट बँका आता थेट तुमच्या दारी सेवा देणार आहे. तुम्हाला त्यासाठी नाममात्र शुल्क मोजावे लागेल. जास्त डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल, तर काय आहे ही योजना

IPPB : पोस्टाची बँक आता तुमच्या दारी! मिळतील सर्व सुविधा, करावे लागेल हे काम
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:21 PM

नवी दिल्ली : इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे (India Post Payments Bank) नाव तर तुम्ही ऐकले असेलच, ज्याठिकाणी भारतीय बँका पोहचल्या नाहीत, अशा ठिकाणी पोस्ट खात्याची बँक लवकरच पोहचणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इतर अनेक बचत योजना खेड्यापाड्यांमध्ये पोहचवण्याचे, टपाल खाते हे माध्यम ठरले आहे. आता आयपीपीबी (IPPB) या बँकेच्या माध्यमातून देशातील आर्थिक नाड्या मजबूत करण्याचे काम पोस्ट ऑफिस करणार आहे. देशभरातील कोट्यावधी ग्राहकांसाठी आता टपाल खात्याच्या या बँकेने जबरदस्त ऑफर आणली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या योजनांचा तुम्हाला घरपोच लाभ घेता येईल.

अशी आहे ऑफर

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम, खास सेवेतंर्गत तुम्हाला खास बचत खाते (Premium Saving Account) खाते उघडता येईल. यापूर्वी जर तुम्ही बेसिक बचत खाते उघडले असेल तर या खास बचत खात्यात तुम्हाला हस्तांतरीत करता येईल. त्यासाठी अपग्रेड हा पर्याय तुमच्या मोबाईल ॲपमध्ये मिळेल. या प्रीमियम खात्याच्या सहायाने तुम्हाला डोअरस्टेप बँकिंगचा म्हणजेच घरपोच बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

हे सुद्धा वाचा

काय मिळले सुविधा

पोस्ट खात्याच्या या प्रीमियम सेव्हिंग अकाऊंटमध्ये, बचत खात्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. यामध्ये कर्ज, व्हर्चुअल डेबिट कार्ड, डोअर स्टेप बँकिंग यासारख्या सुविधा मिळतील. जर तुम्ही पोस्टा खात्यात प्रीमियम बचत खाते उघडाल तर तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. तुम्ही घरबसल्या कर्जासाठी अर्ज करु शकता. खातेदाराला योजनेतंर्गत व्हर्च्युअल डेबिट कार्डची सुविधा मिळेल. तुम्ही या खात्यामार्फत बिल पेमेंट केले तर कॅशबॅकची सुविधा ही प्राप्त करता येईल.

डिजिटल व्यवहार करणाऱ्यांचा फायदा

पोस्ट ऑफिसच्या प्रीमियम बचत खाते, त्या खातेदारांसाठी अधिक फायेदशीर ठरेल, ज्यांचा डिजिटल व्यवहार अधिक आहे. तुम्ही पोस्ट खात्यातील इतर कोणत्याही बचत खात्यात रक्कम हस्तांतरीत कराल तर त्याचे कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पण पोस्ट सोडून इतर कोणत्याही खात्यात रक्कम हस्तांतरीत कराल तर मात्र शुल्क द्यावे लागेल. या खात्यात निवृत्तीधारकांना त्यांचे हयात प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

किती लागेल शुल्क

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट खात्यात जावे लागेल. पोस्टमन अथवा ग्रामीम डाक सेवेच्या माध्यमातून तुम्ही ही सेवा घेऊ शकता. खाते उघडू शकता. या खात्यासाठी दरवर्षी तुम्हाला दरवर्षी 99 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तर खाते उघडण्यासाठी 149 रुपये आणि जीएसटी लागेल. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची, बँलन्सची कोणतीही अट नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.