पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?

देशात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात कोणतीही भाववाढ करण्यात आलेली नाही. मात्र पुढील आठवड्यात इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्चे तेल (crude oil) प्रति डॉलर 100 रुपयांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज आठवड्याभरापूर्वीच लावण्यात आला होता.

पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 7:08 AM

नवी दिल्ली :  देशात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात कोणतीही भाववाढ करण्यात आलेली नाही. मात्र पुढील आठवड्यात इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्चे तेल (crude oil) प्रति डॉलर 100 रुपयांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज आठवड्याभरापूर्वीच लावण्यात आला होता. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी आणि किती वाढणार याबाबत निश्चित माहिती नव्हती. तज्ज्ञांच्या मते पुढील आठवड्यात पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात हळहळू दरवाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. मात्र कच्चे तेल महाग होऊन देखील भारतात इंधनाच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. याचा मोठा फटका हा इंधन कंपन्यांना (Oil Marketing Companies)बसत आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पुढील आठवड्यात पेट्रोल नऊ रुपयांनी महाग होण्याचा अंदाज आहे.

निवडणुकांच्या निकालानंतर भाववाढ

ब्रोकरेज कंपनी जे. पी. मॉर्गन या कंपनीच्या रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आहे. या निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले जाऊ शकतात. उत्तरप्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या सात मार्चला आहे. त्यानंतर पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या दहा मार्चला जाहीर होणार आहेत. एकिकडे आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देखील भारतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये येणाऱ्या काळात मोठी वाढ पहायला मिळू शकते.

110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले कच्चे तेल

गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा बाजारपेठेवर होताना दिसत आहे. महागाईचा भडका उडाला आहे. धातूसह सर्वच गोष्टी महागल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मागील काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास चार टक्क्यांची वाढ झाली असून, कच्चे तेल 110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. युद्ध सुरूच राहिल्यास येत्या काळात सर्वच वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल

शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.