पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरात कितीवर गेले पेट्रोल?
रशिया व युक्रेनच्या युध्दामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही महाराष्ट्रासह भारतात गेल्या 116 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, मात्र उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर इंधनाच्या दरात वाढ होउ शकते, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव त्यानंतर रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. सततच्या अस्थिरतेमुळे देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी रविवारी (27 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आजही महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel price today) कोणताही बदल झालेला नाही. भारतात इंधनाचे दर 116 दिवसांपासून स्थिर आहेत. 116 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (petrol diesel price) कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. पाच राज्यांधमील विधानसभा निवडणुकींमुळे याला राजकीय किनार असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी उत्तर प्रदेश निवडणुकांचे (Uttar Pradesh elections) मतदान संपताच इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
oilprice.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 97.93 डॉलरवर पोचले आहेत, शनिवारीही तेलाचे दर त्याच किमतीवर होते. WTI Crude च्या किमती रविवारी 91.59 डॉलरवर गेल्या आहेत, शनिवारी देखील हाच दर होता. ब्रेंट क्रूडची किंमत 97.93 डॉलर आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या शेकडो वस्तूंच्या किमतीही वाढतात. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही गेल्या 116 दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर तेलाच्या किमती वाढू शकतात, असे मानले जात आहे. रशिया व युक्रेनमधील तणाव लवकरात लवकर निवळला नाही तर गंभीर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. भारत हा आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल बाहेरुन आयात करीत असतो. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका भारत व भारता सारख्या तेलाच्या सर्वात जास्त आयातदार देशांना बसणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर
पेट्रोलचे दर
औरंगाबाद 111.64 रुपये प्रतिलीटर कोल्हापुर 110.09 रुपये प्रतिलीटर मुंबई 109.98 रुपये प्रतिलीटर नागपुर 109.71 रुपये प्रतिलीटर नाशिक 110.40 रुपये प्रतिलीटर पुणे 109.52 रुपये प्रतिलीटर ठाणे 110.12 रुपये प्रतिलीटर …..
डिझेलचे दर
औरंगाबाद 95.79 रुपये प्रतिलीटर कोल्हापुर 92.89 रुपये प्रतिलीटर मुंबई 94.14 रुपये प्रतिलीटर नागपुर 92.53 रुपये प्रतिलीटर नाशिक 93.16 रुपये प्रतिलीटर पुणे 92.31 रुपये प्रतिलीटर ठाणे 94.28 रुपये प्रतिलीटर
संबंधित बातम्या :
IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या
पोस्टाची ही योजना बचतीसाठी आहे ‘बेस्ट’, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये…