फक्त दोन रुपयांची बचत करा आणि मिळवा 36000 रुपये; केंद्र सरकारची खास योजना, जाणून घ्या सर्वकाही

ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळतील. तुम्ही महिन्याला जितके पैसे जमा कराल तेवढीच पेन्शन भविष्यात तुम्हाला मिळेल. | pm shram yogi yojna

फक्त दोन रुपयांची बचत करा आणि मिळवा 36000 रुपये; केंद्र सरकारची खास योजना, जाणून घ्या सर्वकाही
पीएम श्रमयोगी योजना
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक निवृत्तीवेतन योजना (Pension Scheme) चालवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना. या योजनेतंर्गत तुम्ही दिवसाला फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करुन म्हातारपणी वर्षाला 36 हजारांची पेन्शन मिळवू शकता.

सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असेल तर पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या माध्यमातून तुम्हाला म्हातारपणी महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळेल. केंद्र सरकारने 2019 साली ही योजना सुरु केली होती. येत्या पाच वर्षांमध्ये असंघटित क्षेत्रातील 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळतील. तुम्ही महिन्याला जितके पैसे जमा कराल तेवढीच पेन्शन भविष्यात तुम्हाला मिळेल.

मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. तुमचे मासिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. तसेच संघटित क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा राज्य कर्मचारी विमा निगम या योजनांचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत पैसे गुंतवता येणार नाहीत.

कोणासाठी आहे ही योजना?

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत कोणत्याही भारतीय व्यक्तीला पैसे गुंतवता येऊ शकतात. या व्यक्तीचे वय 18 ते 40 इतक्या वयोगटातील हवे. विशेषत: चांभार, शिंपी, रिक्षाचालक, धोबी आणि मजूरवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून ही योजना सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला देशातील असंघटित क्षेत्रात साधारण 42 कोटी कामगार आहेत.

वयाच्या 18 व्या वर्षापासून महिन्याला 55 रुपये, 29व्या वर्षापासून महिन्याला 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तीने महिन्याला 200 रुपये जमा करणे अपेक्षित आहे. पेन्शन मिळण्यापूर्वी संबधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर 50 टक्के हिस्सा त्याच्या पती अथवा पत्नीला मिळेल.

योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड, जनधन खाते आणि मोबाईल क्रमांक या तीन गोष्टी गरजेच्या आहेत. जीवन विमा निगम (LIC) ची शाखा, राज्य कर्मचारी विमा निगम (ईएसआईसी) किंवा ईपीएफओमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता.

संबंधित बातम्या:

घरबसल्या Postal Life Insurance bond साठी अर्ज कसा कराल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया?

अवघ्या 5 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 233 रुपये; एका लाखाच्या गुंतवणुकीवर 42.30 लाख रुपयांची कमाई

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारपेठा गजबजल्या; घरं, गाड्या आणि सोन्याची जोरदार खरेदी

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.