Corona Vaccination | लसवंताला अवघ्या काही सेकंदात व्हॉट्सअपवर प्रमाणपत्र, कोरोना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट अवघ्या काही स्टेपवर

सध्या कोरोना लस घेण्यासाठी सरकार नागरिकांचे मन वळवत आहे. जनजागृतीसह लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कठोर कारवाईचा ही बडगा उगारण्यात आला आहे. पेट्रोल पंपापासून तर अनेक सरकारी कार्यालयात आणि प्रवासात लसवंत झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर चला जाणून घेऊयात काही स्टेप..ज्या तुम्हाला व्हॉटस्अपवरच कोरोनाविरुद्ध लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळून देतील..

Corona Vaccination | लसवंताला अवघ्या काही सेकंदात व्हॉट्सअपवर प्रमाणपत्र, कोरोना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट अवघ्या काही स्टेपवर
WhatsApp
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 9:41 AM

मुंबई : मंडळी, अगोदरच तुमचं भरभरुन अभिनंदन बरं का !  तुम्ही लसवंत झालात. कोरोना (Corona) विरुद्धच्या या लढ्यात तुम्ही ही तुमचं योगदान नोंदवलंत. तर आता तुम्हाला प्रमाणपत्र (Certificate) कसं मिळेल याचा प्रश्न पडला असेल. तर अवघ्या काही सेकंदात तुमचं प्रमाणपत्र तुमच्या व्हॉट्सअपवर (Whatsapp) असेल याची खात्री बाळगा. कसं ते आता आम्ही तुम्हाला सांगतो.

धोका टळला नाही

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली आणि कोविड-19 च्या केसेस कमी झाल्या असल्या तरी धोका टळलेला नाही. ओमायक्रॉनचे नवे भूत आपल्या मानगुटीवर बसू पाहत आहे. तेव्हा लस घेतली असेल तर या संक्रमणापासून दिलासा मिळू शकतो. कोरोनाला हरविण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले आहे. सुरुवातीस ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. त्यानंतर सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा  निर्णय घेतला.

जर तुम्ही लसीचा एकही डोस घेतला नसेल तर तो लवकर घ्या. सरकार लस न घेणाऱ्या नागरिकांविरुद्ध दिवसागणिक कडक धोरण राबवत आहे. मोफत लसीकरण असतानाही नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवल्याने प्रशासनाने अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवांसाठी लसी घेणे बंधनकारक केले आहे. नागरिकांनी लस मोहिमेला अधिक प्रतिसाद द्यावा यासाठी ग्रामीण भागात अधिकारी तळ ठोकून आहेत. तर शहरी भागात काही सोयी-सुविधांवर गंडातर आणून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. तुम्ही ही अद्याप लस घेतली नसेल तर लवकरात लवकर लस घ्या. तुम्ही कोविड-19 लसीचे दोन अथवा एक डोस घेतला असेल तर तुम्हाला मोबाईल आणि व्हाट्सअप द्वारे हे प्रमाणपत्र सहज डाऊनलोड करता येईल.

भारताने केले रेकॉर्ड

कोविड19 विरोधातील लढ्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणारे लसीकरण मोठ्या नेटाने आणि वेगाने पुढे सरसावले आहे. भारताने या लढ्यात अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. देशात 1.33 अब्जाहून नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात 51.5 हून अधिक नागरिकांची दोन्ही डोस पूर्ण झाली आहेत. तर देशात 37.3 टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आला आहे. गाव, वस्ती, शेतात, समुद्रात, डोंगर प्रदेशात नागरिकांना घरी जाऊन लसीचा डोस देण्यात आला आहे.

प्रमाणपत्र अनिवार्य

तर मित्रांनो, अनेक ठिकाणी लसवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालय, सरकारी कार्यालये, प्रवास करताना तुमच्याकडे आयकार्ड(ID) प्रमाणेच प्रमाणपत्र असणे आवश्यक झाले आहे. काही  जिल्हाधिका-यांनी(Collector) लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी थेट पेट्रोलपंप, राशन (Ration) या सेवांचाही यात अंतर्भाव केला आहे. तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर कदाचित तुम्हाला या पेट्रोल आणि स्वस्त धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते. अनेकदा तुम्ही लस घेतलेली असते. मात्र लसीकरणाचा प्रिटेंड प्रमाणपत्र बाळगण्याची अडचण वा प्रमाणपत्रच डाऊनलोड केलं नसल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एका मेसेजवर प्रमाणपत्र

तुम्ही जर लसीचे एक किंवा दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला एकदम झटक्यात, लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. मोबाईलवर काही सेकंदात प्रमाणपत्र तुमच्या व्हाट्सअपवर येईल. त्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये 9013151515 हा क्रमांक सेव्ह करा.

संबंधित बातम्या :

इनकम टॅक्स रिटन भरताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

नवीन वर्ष, ख्रिसमसला मिळणाऱ्या भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट; 20 हजारांनी थेट पगारात वाढ?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.