NSC : पाच वर्षात दहा लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा चौदा लाख; पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजनेचे गणित समजून घ्या
भविष्यात तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफीसची (Post Office) स्मॉल सेव्हिंग्स स्कीम (Small Savings Scheme) नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) हा एक उत्तम पर्याय आहे.
भविष्यात तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफीसची (Post Office) स्मॉल सेव्हिंग्स स्कीम (Small Savings Scheme) नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेचा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देखील मिळतो, सोबतच टॅक्सची देखील बचत होते. इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गंत तुम्हाला या योजनेंतर्गत मिळणाऱ्या परताव्यावर इनकम टॅक्समधून सुट मिळते. सोबतच पोस्टाच्या कोणत्याही योजनेंतर्गत केलेली गुंतवणूक ही सुरक्षीत माणण्यात येते. म्हणजेच तुम्ही जर एखाद्या बँकेत गुंतवणूक केली आणि त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला नव्या सरकारी नियमानुसार केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम वापस भेटू शकते. मात्र पोस्टाच्या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत असे होते नाही, तुम्हाला पूर्ण रक्कम वापस मिळते. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. व्याज दर
योजनेवरील व्याज दर
या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील व्याज दर सतत बदलत राहात. दर तीन महिन्यांनी व्याज दराची नव्याने निश्चिती करण्यात येते. चालू तिमाहीमध्ये नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजनेवर 6.8 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. तुम्ही जर 6.8 टक्के व्याज दराने आज या योजनेत 10 लाख रुपये गुंतवल्यास पाच वर्षांमध्ये तुम्हाला 13.89 लाखांचा परतावा मिळतो. या योजनेमध्ये किती पैसे गुंतवावेत याची काही मर्यादा नाही. कमीत कमी 1000 रुपये गुंतवून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
टॅक्समध्ये सूट
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते. इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गंत तुम्हाला या योजनेंतर्गत मिळणाऱ्या परताव्यावर इनकम टॅक्समधून सूट मिळते. तुम्हाला जर या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक मुदतपूर्व काढायची असल्यास ती केवळ तीन स्थितीमध्येच काढता येते. एक खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, दोन कोर्टाने आदेश दिल्यास अथवा जप्ती प्रकरणात.
संबंधित बातम्या
20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला