Instant Loan Apps : काय सांगता चुटकीसरशी कर्ज, तेही शून्य टक्के व्याजावर, ही तीन अॅप तुम्हाला देऊ शकता पटकन कर्ज
गुगल पेवर तुम्ही अगदी सहज कर्ज घेऊ शकता. खरं म्हणजे गुगल पे काही सरळसरळ कर्ज पुरवठा करत नाही. तर ते मध्यस्थ म्हणून काम करतात. फेडरल बँक अथवा फ्लिपकार्ट यांच्याकडून तुम्ही या माध्यस्थामार्फत कर्ज घेऊ शकता.
मुंबई : तुमच्या आर्थिक तंगीवर तुमच्या खिशातच उपाय सापडला तर ? अहो म्हणजे तुमच्या मोबाईलमधूनच पैशांची सोय झाली तर. उपाय असा की, तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे (Phone pay) , गुगल पे (Google Pay) अथवा पेटीएम (Paytm) यापैकी एक अथवा सर्व अॅप (Mobile App) असेल तर तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. या सर्व अॅपमध्ये त्वरीत कर्ज मिळते. त्यासाठी अगदी कमीतकमी कागदी घोडे नाचवता येतात. फ्लिपकार्टची कंपनी फोन पे ने ग्राहकांसाठी कर्ज सुविधा सुरु केली आहे. कर्ज मिळविण्यासाठी या अॅपवर तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि महत्वाची दोन-तीन कागदपत्रे लागतील. फोन पे, गुगल पे अथवा पेटीएम अॅपवर युपीआय पेमेंट सिस्टम (UPI) अंतर्गत सर्व अॅप एका खात्यातून दुस-या खात्यात रक्कम हस्तांतरीत करु शकतात.
कसं घ्याल तात्काळ कर्जा?
सर्वात अगोदर जाणून घेऊयात, फोन पेवर कर्ज कसे काढता येते, त्याविषयी. फोने पे सरळसरळ ग्राहकांना कर्ज पुरवठा करत नाही. त्यांची पॅरंट कंपनी फ्लिपकार्टच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येतो. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला फोन पे सोबतच फ्लिपकार्टच्या अॅपसोबत व्यवहार करावा लागेल. अगदी शुन्य टक्के व्याजावर हा पतपुरवठा करण्यात येतो, त्यासाठी तुम्हाला कसले ही व्याज द्यावे लागत नाही. त्यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि सिबिल स्कोर (700 प्लस) असणे आवश्यक आहे. फोन पेवरुन तुम्हाला 60 हजार रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज मिळेल. मात्र 45 हजारांहून अधिकचे कर्ज घेणार असाल तर त्यासाठी 0.34 टक्क्यांचे व्याज द्यावे लागेल.
असं करा रजिस्ट्रेशन
मोबाईलमध्ये तुम्हाला फोन पे आणि फ्लिपकार्ट ही दोन्ही अॅप डाऊनलोड करावी लागतील. फोन पेवर मोबाईल क्रमाकाच्या सहायाने नोंदणी करावी लागेल. त्याच मोबाईल क्रमांकाच्या आधारे फ्लिपकार्टवर ही रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर फ्लिपकार्टच्या प्रोफाईल सेगमेंटमध्ये जाऊन लेटर पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावेळी तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात येईल. तसेच सिबील स्कोरची माहिती मागेल. ही सर्व माहिती व कागदपत्रे दिल्यानंतर तात्काळ कर्ज मंजूर करण्यात येईल.
सहज कर्ज मिळणं शक्य
गुगल पेवर ही सहज कर्ज मिळते. काही बँकाकडून गुगल पे तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकते. यामध्ये फेडरल बँकेकडून कर्ज मिळू शकते. गुगल पेवरील मनी सेक्शनमध्ये जाऊन कर्ज घेण्यासाठी विनंती करावी लागेल. याठिकाणी मंजूरपूर्व-प्री अप्रुड कर्ज पुरवठ्याची योजना दिसेल. कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडावा लागेल. याठिकाणी तुम्हाला ईएमआयचा पर्याय दिसेल. तो निवडावा लागेल. तसेच बँकेचे प्रक्रिया शुल्क दिसेल. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर खात्री पटल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण करा आणि ओटीपी आधारे कर्ज रक्कम खात्यात जमा होईल.
किती कर्ज मिळेल?
पेटीएम वर ही त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात येतो. पेटीएम पर्सनल लोन या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला कर्ज मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. पेटीएमवर 10 हजारांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला केवायसीसंबंधी, नोकरी संबंधी आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागते. कर्ज मिळण्यासाठीची माहिती पेटीएम तुम्हाला देईल. तसेच ईएमआय, व्याज किती लागेल, किती कालावधीसाठी कर्ज घेता येईल यासंबंधीची माहिती तुम्हाला मिळेल.
इतर बातम्या
वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय” – जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; अजित पवारांची माहिती
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका