EPFO : अधिक हवी पेन्शन तर घेऊ नका टेन्शन, या तारखेपर्यंत मिळेल संधी

EPFO : जर तुम्ही जास्त पेन्शन योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पण या निवृत्तीधारकांना आता वाढीव पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यांच्यासाठीची डेडलानईन संपली आहे. पण इतर पेन्शनधारकांना या तारखेपर्यंत अर्ज करता येईल.

EPFO : अधिक हवी पेन्शन तर घेऊ नका टेन्शन, या तारखेपर्यंत मिळेल संधी
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 7:23 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही अधिकच्या, जास्त पेन्शन योजनेसाठी (Pension Scheme) अर्ज केला असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पण या निवृत्तीधारकांना (Retire) आता वाढीव पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यांच्यासाठीची डेडलानईन (Deadline) संपली आहे. पण इतर पेन्शनधारकांना या तारखेपर्यंत अर्ज करता येईल. 1 सप्टेंबर 2014 रोजी पूर्वी निवृत्त झालेल्या ईपीएस सदस्यांना आता अधिक पेन्शनचा पर्याय निवडता येणार नाही. शनिवारी त्यांच्यासाठी अंतिम तारीख होती. आता त्यांना जास्त निवृत्तीसाठीचा पर्याय निवडता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजना 1995 ईपीएसअंतर्गत अधिक पेन्शनचा पर्याय 4 मार्चपर्यंत देण्यात आला होता.

पण ईपीएसच्या इतर सदस्यांना मात्र अधिकची पेन्शन मिळण्यासाठीची संधी आहे. 3 मे 2023 रोजीपर्यंत त्यांना जास्त पेन्शनसाठी अर्ज करता येईल. कामगार मंत्रालयाने याविषयीचे एक निवेदन दिले आहे. त्यानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सेवानिवृत्त ईपीएस सदस्यांची संधी हुकली आहे. 4 मार्च 2023 पर्यंत त्यांना ही संधी देण्यात आली होती. शनिवारपर्यंत त्यांना अधिक पेन्शन मिळण्याची संधी देण्यात आली होती. आतापर्यंत ईपीएसओला 91,258 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.

EPFO अधिक पेन्शन पर्यायासाठी संयुक्त अर्ज करु शकतात. त्यासाठी अंतिम तारीख 3 मे, 2023 आहे. 1 सप्टेंबर 2014 रोजी पूर्वी निवृत्त झालेल्या ईपीएस सदस्यांना यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 कर्मचाऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्राथमिकता देण्यात आली होती. त्यावेली 8,897 सदस्यांनी त्यांच्या कंपनीकडे यासाठी अर्ज केला होता.

हे सुद्धा वाचा

EPFO ने डिसेंबर 2022 मध्ये 14.93 लाख नवीन सदस्य जोडले. गेल्या वर्षी याच कालावधीत जोडलेल्या नवीन सदस्य संख्येपेक्षा हा आकडा दोन टक्क्यांनी अधिक आहे. कामगार मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. ईपीएफओतर्फे हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये सदस्य संख्येत 14.93 लाखांची वाढ झाली आहे.

कामगार मंत्रालयानुसार, डिसेंबर 2021 पेक्षा डिसेंबर, 2022 मध्ये ईपीएफओ सदस्यांची संख्या 32,635 हून अधिक वाढली आहे. या तुलनेनुसार, देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे सूचित होते. कामगार मंत्रालयानुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये ईएसआयसीसोबत नवीन 18.03 लाख कर्मचारी जोडल्या गेले आहेत.

मनी9 च्या अहवालानुसार, जर तुम्ही आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पीएफ वा ईपीएफमधून रक्कम काढताना अडचण येईल. तुम्ही पाच वर्षांपूर्वीच या खात्यातून रक्कम काढणार असाल तर तुम्हाला पीएफ विथड्रावलवर कर द्यावा लागेल.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.