AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holiday July : 5 वा 10 दिवस नाही तर इतक्या दिवस बंद राहतील बँका, ही घ्या सुट्यांची संपूर्ण यादी

Bank Holiday July : पुढील महिन्यात बँकांना 5 वा 10 दिवस नाही तर इतक्या दिवस राहतील. त्यामुळे तुमची बँकेतील काही महत्वाची कामे अडकली असतील तर ती पटकन उरकून घ्या. नाहीतर नाहक उशीर होईल.

Bank Holiday July : 5 वा 10 दिवस नाही तर इतक्या दिवस बंद राहतील बँका, ही घ्या सुट्यांची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 2:38 PM

नवी दिल्ली : जुलै 2023 मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी मिळून देशातील बँका जवळपास 15 दिवस बंद (Bank Holiday July 2023) राहतील. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील बँका दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरु असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार, बँका सर्व सार्वजनिक सणांच्या दिवशी बंद राहतील. काही बँका स्थानिक सुट्यांच्या दिवशी बंद असतील. स्थानिक सुट्या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून निश्चित होतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील बँका दर रविवारी बंद राहतात.

जुलै महिन्यात एकूण 15 सुट्या जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशीपण सुट्या आहेत. या सुट्यांची सुरुवात येत्या 5 जुलैपासून होणार आहे. गुरु हरगोविंद यांच्या जन्मदिवशी सुटी राहील. 29 जुलै रोजी मोहरमच्या दिवशी सुटी असेल. काही राज्य वगळता संपूर्ण देशात या सुट्या लागू असतील. तर 7 सुट्या या शनिवार आणि रविवार मिळून असतील. जुलै महिन्यात 5 रविवार तर दोन शनिवार आहेत. जुलै महिन्यात एकूण 15 सुट्या असतील. जर एखाद्याला बँकेत अत्यंत महत्वाचे काम असेल तर ते लवकर उरकून घ्या. नाहीतर सुट्यांची यादी पाहूनच बँकेत जावे.

व्यवहार करता येणार बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

2000 रुपयांच्या नोटा होत आहेत जमा देशातील सर्व बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. मे महिन्यात आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिकांना सप्टेंबरपर्यंत या 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येतील. पण बाजारात कमी नोटा असल्याने सुरुवातीचे दिवस वगळता आता कमी नोटा चलनात आहेत. तुमच्याकडे या नोटा अजूनही असतील तर सुट्टीचे नियोजन पाहुन बँकेत या नोटा जमा करता येतील.

बँकेच्या सुट्यांची यादी

  1. 2 जुलै 2023: रविवार
  2. 5 जुलै 2023: गुरु हरगोविंद सिंह जयंती (जम्मू, श्रीनगर)
  3. 6 जुलै 2023: एमएचआईपी दिन (मिझोरम)
  4. 8 जुलै 2023 : दूसरा शनिवार
  5. 9 जुलै 2023: रविवार
  6. 11 जुलै 2023: केर पूजा (त्रिपुरा)
  7. 13 जुलै 2023: भानु जयंती (सिक्किम)
  8. 16 जुलै 2023: रविवार
  9. 17 जुलै 2023: यू तिरोट सिंग डे (मेघालय)
  10. 21 जुलै 2023: द्रुक्पा त्शे-ज़ी (गंगटोक)
  11. 22 जुलै 2023 : शनिवार
  12. 23 जुलै 2023: रविवार
  13. 29 जुलै 2023: मोहरम
  14. 30 जुलै 2023: रविवार
  15. 31 जुलै 2023: हुतात्मा दिन (हरियाणा और पंजाब)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....