Bank Holiday | कर्मचाऱ्यांचे संपाचे हत्यार, सुट्यांमुळे बँका राहतील बंद, उरकून घ्या महत्वाची कामे

Bank Holidays Maharashtra December 2023 | येत्या डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे या वर्षाअखेर बँकेशी संबंधित काही कामे करायची असतील तर ती झटपट उरकून घ्या. त्यातच बँकेच्या संघटना संपाचे हत्यार उपासण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कामकाज होणार नाही. प्रत्येक राज्यानुसार बँकेच्या सुट्या वेगवेगळ्या आहेत.

Bank Holiday | कर्मचाऱ्यांचे संपाचे हत्यार, सुट्यांमुळे बँका राहतील बंद, उरकून घ्या महत्वाची कामे
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 1:22 PM

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीमुळे आणि इतर दिवस लक्षात घेता सुट्यांचा सुकाळ होता. डिसेंबर महिन्यात सणांची रेलचेल नसली तरी देशभरात 18 दिवस सुट्या मुक्काम ठोकणार आहेत. कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संपावर जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी 6 दिवसांच्या संपावर जाण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका कामकाजावर दिसेल. त्यामुळे पुढील महिन्यात कामकाज कमी आणि सुट्या अधिक असा मामला होऊ शकतो. तेव्हा बँकेशी संबंधित काही कामकाज असेल तर ते लवकर पूर्ण करा. दैनंदिन व्यवहार तुम्हाला ऑनलाईन बँकेद्वारे पूर्ण करता येतील.

6 दिवसांची संपाची घोषणा

अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघाने (AIBEA) डिसेंबर महिन्यात 6 दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. देशभरातील बँकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होईल. 4 डिसेंबर रोजी पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी संपावर असतील. तर इतर तारखेला इतर बँकेतील कर्मचारी संपावर जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

अशा जाहीर होतात सुट्या

भारतीय रिझर्व्ह बँक तीन श्रेणीत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी जाहीर होते. या सुट्या शनिवारी आणि रविवार व्यतिरिक्त दिल्या जातात. दसरा, दिवाळी आणि इतर सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

देशभरातील बँकांना डिसेंबर महिन्यातील सुट्या

  • 1 डिसेंबर – अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्य स्थापना दिवसामुळे बँकेला सुट्टी
  • 3 डिसेंबर – रविवार
  • 4 डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्टिव्हल असल्याने गोव्यात बँकेला ताळे
  • 9 डिसेंबर – महिन्याचा दुसरा शनिवार
  • 10 डिसेंबर – रविवार
  • 12 डिसेंबर – मेघालयमध्ये पा-टोगन नेंगमिंजामुळे कामकाज नाही
  • 13 डिसेंबर- लोसुंग/नमसुंगमुळे सिक्कीममध्ये बँका बंद
  • 14 डिसेंबर – सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंगमुळे काही भागात बँकेला सुट्टी
  • 17 डिसेंबर- रविवार
  • 18 डिसेंबर- मेघालयात यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त कामकाज बंद
  • 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिनानिमित्त बँकेला सुट्टी
  • 23 डिसेंबर – महिन्याचा चौथा शनिवार
  • 24 डिसेंबर – रविवार
  • 25 डिसेंबर – नाताळामुळे देशभरातील बँकांना सु्ट्टी
  • 26 डिसेंबर – मिझोराम, नागालँड आणि मेघालयात ख्रिसमसची सुट्टी
  • 27 डिसेंबर – नागालँडमध्ये ख्रिसमसमुळे कामकाज नाही
  • 30 डिसेंबर – मेघालयात बँकाना सुट्टी
  • 31 डिसेंबर – रविवार
Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.