भारतात उघडणार गोल्ड एक्सचेंज, सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्व बाबी

गोल्ड एक्सचेंज आल्यानंतर शेअरप्रमाणे सोन्याची ट्रेडिंग सुरु होईल. यात सुरुवातीला काही काम आऊट सोर्च होणार होतं. पण आता निर्यण झाला आहे की सर्वकाही सेबीच्या देखरेखीत होणार आहे. एक इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट असेल, ज्याद्वारे गोलड एक्सचेंडमध्ये कामकाज होईल.

भारतात उघडणार गोल्ड एक्सचेंज, सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्व बाबी
सोनं
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:25 PM

मुंबई : भारतात लवकरच गोल्ड एक्सचेंजची सुरुवात होण्याची शक्यता आहे. सरकार गेल्या अनेक दिवसांपासून गोल्ड एक्सचेंज उघडण्याची योजना बनवत आहे. बजेटमध्येही याची घोषणा झाली आहे आणि ते अस्तित्वात आणण्यासाठी काम सुरु करण्यात आलं आहे. शेअर बाजारात रेग्युलेटर सेबी (SEBI – सेक्युरिटी अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने एक्सचेंजवर कंसल्टेशन पेपर जारी करण्यात आलाय. यात हे सांगण्यात आलं आहे की, हे एक्सचेंज कसं काम करतं आणि सोबतच हितचिंतकांकडून सल्लाही मागवला आहे. (Gold exchange to open in India, what will be the effect on those who buy gold jewellery?)

गोल्ड एक्सचेंज आल्यानंतर शेअरप्रमाणे सोन्याची ट्रेडिंग सुरु होईल. यात सुरुवातीला काही काम आऊट सोर्च होणार होतं. पण आता निर्यण झाला आहे की सर्वकाही सेबीच्या देखरेखीत होणार आहे. एक इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट असेल, ज्याद्वारे गोलड एक्सचेंडमध्ये कामकाज होईल. गोल्ड एक्सचेंज अस्तित्वात आल्यामुळे किंमत आणि गुणवत्तेत पारदर्शकता वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गोल्ड एक्सचेंज कसं काम करेल?

सीएनबीसी आवाजच्या एका रिपोर्टनुसार एक्सचेंजमध्ये सर्वात प्रथम ट्रेडिंग कंपनी वॉल्टजवळ सोनं जमा करेल. त्यानतंर वॉल्ट मॅनेजर सोन्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) जारी करेल. EGR द्वारे एक्सचेंजवर लिस्ट केलं जाईल. म्हणजे ईजीआर गरजेचा असेल कारण याद्वारेच तुम्ही ट्रेंड करु शकाल. लिस्टिंगनंतर ईजीआर शेअरप्रमाणे ट्रेडिंग होईल. शेअरनुसार ईजीआरची क्लिअरिंग आणि सेटलमेंटचं काम होईल. 5 ग्रामपासून 1 किलोपर्यंतचा लॉट उपलब्ध असेल, ज्यात ट्रेडिंग केलं जाईल.

..तर परत मिळेल फिजिकल गोल्ड

जर तुम्ही ईजीआरमध्ये ट्रेडिंग करणार नसाल तर तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळवण्यासाठी ईजीआर सरेंडर करावा लागेल. त्यानंतर वॉल्ट मॅनेजर ईजीआरच्या बदल्यात तुम्हाला फिजिकल गोल्ड रिटर्न मिळेल. फिजिकल गोल्ड दिल्यानंतर ईजीआर आपोआप रद्द होईल. असं मानलं जातं की गोल्ड एक्सचेंड आल्यानं बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. एक्सचेंज आल्यानंतर बुलियन इंडस्ट्रीमध्ये एक ट्रान्सपरंट सिस्टिम बनेल आणि नॅशनल प्राईज होईल, ज्यामुळे ज्वेलर्सला मोठा फायदा होईल.

भारत ग्लोबल गोल्ड ट्रेडिंग बनू शकतो

अनेक देशात गोल्ड एक्सचेंज यशस्वीरित्या काम करत आहे. भारताप्रमाणे गोल्ड मार्केटमध्ये एक्सचेंज आल्यामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे ग्राहकांसोबत ज्वेलर्स आणि बीटूबी काम करणाऱ्यांनाही लाभ मिळेल. असं मानलं जातं की एक्सचेंजच्या अस्तित्वात आल्यानंतर भारत गोल्बल गोल्ड ट्रेडिंगचं हब बनू शकतो. तर अनेक इंटरनॅशनल इनव्हेस्टर्सही गोल्ड ट्रेडमध्ये नशीब आजमावताना दिसून येऊ शकतात. विशेषज्ञांच्या मते गोल्ड एक्सचेंज आल्यामुळे एक व्हायब्रंट इकोसिस्टिम बनेल, ज्यामुळे सर्वांना फायदा होईल.

संबंधित बातम्या :

तुम्ही दुसऱ्या राज्यात जाण्याचं नियोजन करत आहात? जाणून घ्या सर्व राज्यांचे नियम एका क्लिकवर

‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

Gold exchange to open in India, what will be the effect on those who buy gold jewellery?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.