अर्थचक्रावर ‘ओमिक्रॉन’चं मळभ: सोनं गाठणार 55 हजारांचा टप्पा, बाजाराचे संकेत

सध्या सोन्याची प्रति 10 ग्रॅम 48000 रुपये भावाने विक्री केली जात आहे. सोन्याच्या सर्वोच्च भावापेक्षा 14 टक्के आणि जानेवारी 2021 च्या तुलनेने चार टक्के कमी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय किंमतीच्या तुलनेत तीन टक्क्यांहून अधिक आहे.

अर्थचक्रावर ‘ओमिक्रॉन’चं मळभ: सोनं गाठणार 55 हजारांचा टप्पा, बाजाराचे संकेत
सोन्याच्या भावात पडझड, चांदी गडगडली
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 7:50 PM

नवी दिल्ली : नववर्षाचं आर्थिक जगतानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. सोने आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंसाठी वर्ष 2021मध्ये कामगिरी सरासरी राहिली. गत वर्षात सोन्याच्या वार्षिक परताव्यात 3 टक्क्यांनी घट नोंदविली गेली. वर्ष 2015 नंतर सोन्याच्या वार्षिक परताव्यात पहिल्यांदाच घट नोंदविली गेली. मात्र, अर्थचक्रावरील ओमिक्रॉनच्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ, डॉलरचा सावरलेला भाव, कच्चा इंधनाच्या भावांतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर जाणविण्याची शक्यता असल्याचे कमोडिटी मार्केटच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणारी वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,000 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

सोन्याची ‘रेकॉर्ड’ब्रेक कामगिरी

कोविड प्रकोपाच्या पहिल्या लाटेदरम्यान सोन्याने उच्चांक गाठला होता. प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. मात्र, वर्ष 2021 मध्ये सोन्याने गुंतवणुकदारांना अपेक्षित साथ दिली नाही. शेअर्स बाजारातील तेजीच्या कामगिरीमुळे गुंतवणुकदारांनी सोने गुंतवणुकीकडे पाठ फिरवली.

‘सर्वोच्च’ भावापेक्षा 14 टक्क्यांनी स्वस्त

सध्या सोन्याची प्रति 10 ग्रॅम 48000 रुपये भावाने विक्री केली जात आहे. सोन्याच्या सर्वोच्च भावापेक्षा 14 टक्के आणि जानेवारी 2021 च्या तुलनेने चार टक्के कमी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय किंमतीच्या तुलनेत तीन टक्क्यांहून अधिक आहे. अमेरिका डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या परिणामुळे स्थिती निर्माण झाल्याचे अर्थ अभ्यासकांचे मत आहे.

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

कोविडचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’चा संसर्गात वाढ होत आहे. युरोपीय राष्ट्रांत सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहे. युरोपीय राष्ट्रांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याने नागरिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

या आठवड्यात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने 1830.40 डॉलरवर बंद झाला. सोन्याच्या भावात वर्षाच्या मध्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई संबंधित चिंता तसेच कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे असलेली अनिश्चितता यामुळे तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. शेअर बाजारात पडझड आणि महागाईचा सामना करण्यासाठी अर्थसाधन म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तणाव स्थिती निर्माण झाल्यास गुंतवणुकीचा ओघ अधिक वाढण्याचा अंदाज मार्केटच्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट

आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.