मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine crisis) सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलासह सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्याच्या (gold) दरात देखील तेजी दिसून येत आहे. युद्धामुळे शेअर बाजार, किप्टोकरन्सी अशा सर्वच गुंतवणुकीच्या (investment) पर्यायांवर अनिश्चिततेचे सावट आहे. अशा वेळी गुंतवणूक करावी तर कशात करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक जण अनिश्चिततेचा काळात गुंतवणुकीसाठी सुरक्षीत मार्ग म्हणून सोन्यातील गुंतवणुकीकडे पाहातात. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान 15 टक्के गुंतवणूक तरी सोन्यात करावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे पेपर गोल्ड, प्रत्यक्ष गोल्ड आणि तिसरा प्रकार म्हणजे डिजिटल गोल्ड आपण या प्रकारांबाबत तसेच त्यात गुंतवणूक कशी करावी याबाबत जाणून घेऊयात.
गुंतवणुकीचा हा प्रकार सरळ साधा आहे. यामध्ये तुम्ही सोन्याचे दागीने, सोन्याचे कॉइन किंवा सोन्याची बिस्किटे खरेदी करू शकता. जेव्हा सोन्याचे दर कमी होतात, तेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकतात. त्यानंतर जेव्हा सोन्याचे दर वाढतील तेव्हा तुम्ही तुमच्या जवळील सोन्याची विक्री करू शकातात. यातून तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता असते.
पेपर गोल्ड हा सोन्यातील गुंतवणुकीचा असा प्रकार आहे, ज्यामध्ये तुमचा सर्व व्यवहार हा पेपरवरच असतो. ज्यामध्ये तुम्हाला फक्त पेपरवरच सोने मिळते. या गुंतवणुकीमधील परतावा सोन्याच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो. म्हणजेच तुम्हाला सोने मिळत नाही पण शुद्ध सोन्यात गुंतवणुकीशी संबंधित सर्व फायदे मिळतात. यामध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणि सार्वभौम सुवर्ण रोखे यांचा समावेश आहे. गुंतवणुकीसाठी ठोस सोन्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला घरात दागिन्यांची गरज नसेल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचे नसेल तर तुम्ही या पद्धतीने गुंतवणूक करू शकता. अशा पद्धतीने गुंतवणूक केल्यास चोरीचा देखील धोका कमी होतो.
डिजिट सोने हा देखील सोन्यातील गुंतवणूकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तु्म्हाला सोन्यात कमी आणि मर्यादीत काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या मार्गाची निवड करू शकता. गुगल पे, फोन पे सारखे अनेक ऍप आहेत जे तुम्हाला डिजिटल गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देतात. डिजिटल गुंतवणुकीचा एक मुख्य फायदा असा की तुम्हाला कधीही सोन्यात गुंतवणूक करता येते, व सोने दर वाढल्यास त्यातून लगेच परतावा देखील मिळवता येतो.
पुढील दोन महिने देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवणार नाही; खाद्यतेल पुरवठा उद्योजकांचे सरकारला अश्वासन
रशिया-युक्रेन युद्धाची धग थेट किचनपर्यंत, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका
Russia-Ukraine war : बिस्किट खरेदीपासून ते हॉटेलमधील जेवणापर्यंत सर्वच वस्तू महागणार!