GOLD LOAN: कोणत्या बँकेकडून सर्वात कमी दरात गोल्ड लोन? प्रक्रिया शुल्कासह व्याजदर जाणून घ्या

आपत्कालीन कामासाठी पैसे हवे असल्यास सोने तारण कर्ज तुम्हाला फायदेशीर ठरेल. कमी कागदपत्रांसह सोने तारण कर्जाला तत्काळ मान्यता दिली जाते.

GOLD LOAN: कोणत्या बँकेकडून सर्वात कमी दरात गोल्ड लोन? प्रक्रिया शुल्कासह व्याजदर जाणून घ्या
सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:56 PM

मुंबईवैयक्तिक गरजांच्या पूर्ततेसाठी पैशांची उपलब्धता करण्यासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध आहेत. वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय अनेकजण अजमावितात. तर काही जण सोने तारण कर्जाद्वारे (Gold Loan) पैसा उभा करतात. सोने तारण कर्ज हे वैयक्तिक कर्जापेक्षा (Gold loan vs personal loan) अधिक फायदेशीर आहे. तुमच्याकडे अतिरिक्त सोने आहे आणि तुम्हाला पैशांची आवश्यकता असल्यास सोने तारण कर्जाचा पर्याय तुम्ही नक्कीच अजमावून पाहायला हवा. वैयक्तिक कर्ज प्रक्रियेत उत्पन्नाच्या साधनांच्या आधारावर कर्जदाराचे मूल्यमापन केले जाते. वैयक्तिक कर्जासाठी एकाधिक कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी अधिक कालावधी लागतो. आपत्कालीन कामासाठी पैसे हवे असल्यास सोने तारण कर्ज तुम्हाला फायदेशीर ठरेल. कमी कागदपत्रांसह सोने तारण कर्जाला तत्काळ मान्यता दिली जाते.

नेमक्या कोणत्या बँकाकडून किती टक्के व्याजदर दिला जातो. सर्व काही जाणून घेऊया ‘पॉईंट टू पॉईंट’:-

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र सध्या 7 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करते. महाराष्ट्र बँकेकडून प्रक्रिया शुल्क 500 रुपयांपासून 2000 रुपये अधिक जीएसटी याप्रमाणात आकारले जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

भारतातील आघाडीची स्टेंट बँक ऑफ इंडिया गोल्ड लोन वर 7 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर प्रदान करते. एसबीय मध्ये 0.50 टक्के अधिक जीएसटी प्रक्रिया शुल्काच्या रुपात आकारले जातात.

पंजाब अँड सिंध बँक

पंजाब अँड सिंध बँक सध्या गोल्ड लोनवर 7 टक्के ते 7.50 टक्के व्याजदरात उपलब्ध करते. यामध्ये 500 रुपयांपासून अधिकतम 10,000 रुपयांचे प्रक्रिया शुल्क लागू शकते.

यूनियन बँक

यूनियन बँकेद्वारे गोल्ड लोनवर सध्या 7.25 टक्के ते 8.25 टक्के व्याजदर दिले जाते.

कॅनरा बैंक

कॅनरा बँकेचा विचार केल्यास बँकेत गोल्ड लोन वर 7.35 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. यामध्ये 500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत प्रक्रिया शुल्क अदा करावे लागतात.

इंडियन बँक

इंडियन बँक द्वारे सध्या 7.50 ते 8 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. बँकेद्वारे 0.56 टक्के प्रक्रिया शुल्काच्या रुपात आकारले जातात.

सोने तारण कर्जाचे लाभ दृष्टीक्षेपात:

• अन्य कर्ज प्रकारांच्या सापेक्ष कमी व्याजदर • कर्ज प्राप्तीसाठी किमान कागदपत्रे, त्रासमुक्त प्रक्रिया • सोन्याच्या बँकेत सुरक्षेसोबत पैशांची प्राप्ती • सिबिल स्कोअरची चिंता नाही • आपत्कालीन परिस्थितीत तासाच्या आत पैसे

POST BANK INTREST RATE: व्याजदराला कात्री, 5कोटी खातेधारकांसमोर प्रश्नचिन्ह; नवे व्याजदर काय?

GOLD PRICE TODAY : महाराष्ट्रातील सोने बाजार पडझडीनंतर सावरला, मुंबईसह पुण्यात भाववाढ

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.