Gold-Silver Price : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक; आज भाव स्थिर
गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold-Silver Price) वाढ सुरूच होती. आज मात्र सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 22 कॅरट सोन्याचे (Gold) दर प्रति तोळा 49,550 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54,060 रुपये आहेत.
Gold-Silver Price Today : गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold-Silver Price) वाढ सुरूच होती. आज मात्र सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 22 कॅरट सोन्याचे (Gold) दर प्रति तोळा 49,550 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54,060 रुपये आहेत. शुक्रवारी देखील 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,550 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54,060 रुपये इतकेच होते. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे (Silver) दर देखील स्थिर आहेत, आज राज्यात चांदीचा दर 70 हजार रुपये प्रति किलो आहे. सोन्याचे दर हे सोन्याचे मुल्य अधिक सोन्याच्या दागीने घडवण्याचा दर असे ठरत असल्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याचे मुल्य हे वेगवेगळे असते. सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्यामुळे अधिक परताव्याच्या अशेने अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
सलग चार दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे दर हे दिवसांतून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच सोन्याचे जर जारी केले जातात. तर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा सोन्याचे दर जाहीर होतात. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर 49,350 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 54 हजार 60 रुपयांवर पोहोचला आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर 49580 तर 24 कॅरट सोन्याचा दर 54 हजार 90 रुपये इतका आहे. पुण्यात 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 49580 आणि 54 हजार 90 रुपये इतका आहे.
सोन्याच्या भावात तेजीचा अंदाज
गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर वाढत होते. त्याला आज ब्रेक लागला आहे. आज जरी सोन्याचे दर स्थिर असले तरी देखील गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोना काळात मार्केट डाऊन असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर देखील झाला होता. सोन्याचे दर 45 हजारापर्यंत खाली आले होते. मात्र चालू वर्षात सोने प्रति तोळा तब्बल 54 हजारांवर पोहोचले आहे. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
संबंधित बातम्या
तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ
CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका