Gold price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8330 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Gold price | 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यावर सोन्याची प्रतितोळा किंमत 56200 रुपयांवर पोहोचली होती. आजच्या दरानुसार ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 47,868 रुपये प्रतितोळा इतकी आहे.

Gold price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8330 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:22 AM

नवी दिल्ली: दसऱ्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात वेगाने चढउतार होताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर शुक्रवारी सप्टेंबर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात 0.19 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. तर चांदीच्या दरात 0.44 टक्क्यांची घसरण झाली. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यावर सोन्याची प्रतितोळा किंमत 56200 रुपयांवर पोहोचली होती. आजच्या दरानुसार ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 47,868 रुपये प्रतितोळा इतकी आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड स्तरापेक्षा 8330 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीच्या दरात घसरण होऊन त्याची किंमत प्रतिकिलो 64,648 रुपये इतकी झाली आहे.

सोन्याचा भाव 50 हजारांपर्यंत जाणार?

सोन्याच्या सध्याच्या किंमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किxमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याची मागणी अशीच वाढत राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आत्ताच सोने खरेदी केल्यास तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.

यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्तात मिळणार?

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

इतर बातम्या

Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.