Gold price today: सलग तीन दिवस सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव
Gold price | गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,225 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. जेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा तब्बल 8000 रुपयांनी स्वस्त आहे.
नवी दिल्ली: आज छठ पूजेच्या दिवशी (छठ पूजा 2021) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 62 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज बुधवारी सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 48,225.00 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. तर दुसरीकडे चांदी महाग झाली आहे. चांदीच्या दरात 236 रुपयांची वाढ दिसून येत आहे. आज चांदी MXC वर 64,806.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
रेकॉर्ड स्तरापासून 8000 रुपयांनी स्वस्त
गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,225 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. जेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा तब्बल 8000 रुपयांनी स्वस्त आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर
तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.
दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई
घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?
आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया