Gold Price Today: सोनं खरेदी करण्यासाठी उत्तम संधी, पाच महिन्यांतील निचांकी पातळीवर, रेकॉर्ड दरापेक्षा 10 हजारांनी स्वस्त
Gold price | गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 10140 रुपयांनी स्वस्त आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या घसरणीची मालिका शुक्रवारीही कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात 0.03 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा 46,060 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. हा गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकी स्तर आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 10140 रुपयांनी स्वस्त आहे.
तर दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी वाढून 61.231 रुपये प्रतिकिलो या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या सत्रात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यावेळी चांदीचा भाव जवळपास 2150 रुपयांनी घसरला होता.
सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा तब्बल 10 हजारांनी स्वस्त
गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 10140 रुपयांनी स्वस्त आहे.
‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.
गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.
दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका