Gold Price Today : दिल्लीत सोने 50 हजार पार, जाणून घ्या-महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातील ताजे भाव
आर्थिक राजधानी मुंबईत सोन्यापेक्षा चांदीला लकाकी मिळाली आहे. आज (मंगळवारी) चांदीचा बाजारभाव प्रति किलो 62,200 रुपयांवर बंद झाला. 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49,090 रुपये भाव (MUMBAI GOLD RATE) मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47,090 रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या भावावर दिसून आला. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याला (DELHI GOLD RATE) प्रति तोळा 51430 रुपये भाव मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47140 रुपयांवर पोहोचले. आर्थिक राजधानी मुंबईत सोन्यापेक्षा चांदीला लकाकी मिळाली. आज (मंगळवारी) चांदीचा बाजारभाव प्रति किलो 62200 रुपयांवर बंद झाला. 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49090 रुपये भाव (MUBAI GOLD RATE) मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47090 रुपयांवर पोहोचले. मुंबईखालोखाल पुण्यात मात्र सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली. उपराजधानी नागपूरमध्ये (NAGPUR GOLD RATE) 24 कॅरेट सोने 49090 रुपयांवर पोहोचले. ‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सध्या सोने-चांदीच्या भावात चढ-उताराचे चित्र दिसून येत आहे.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई- 49090 रुपये
- पुणे- 48840 रुपये
- नागपूर- 49090 रुपये
- नाशिक- 48840 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई- 47090 रुपये
- पुणे- 46320 रुपये
- नागपूर- 47090 रुपये
- नाशिक- 46320 रुपये
आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत
सोने आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंसाठी वर्ष 2021 मध्ये कामगिरी सरासरी राहिली. गत वर्षात सोन्याच्या वार्षिक परताव्यात 3 टक्क्यांनी घट नोंदविली गेली. वर्ष 2015 नंतर सोन्याच्या वार्षिक परताव्यात पहिल्यांदाच घट नोंदविली गेली. मात्र, अर्थचक्रावरील ओमिक्रॉनच्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. मात्र, मुंबईत टास्क फोर्सच्या सदस्यांनी तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू मुंबईने ओलांडल्याचे अनुमान व्यक्त केल्याने आर्थिक तज्ज्ञांच्या मतानुसार सोने 55 हजारांचा टप्पा गाठण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव जाणून घेऊ शकता. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड् कॉल द्या आणि तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकता.
सोन्याची शुद्धता ‘अॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंचं मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).
इतर बातम्या
Gold Import | कोरोना काळातही सोन्याची आयात दुप्पट, भारतीय ग्राहकांची रेकॉर्डब्रेक खरेदी
बजेटआधीचे पडघम : दोन मिनिटांत समजून घ्या, तुमच्या सॅलरीवर किती टॅक्स लागणार?