Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त
Gold price | गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 8200 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट मर्यादेत वर खाली असलेल्या सोन्याच्या दरात बुधवारी पुन्हा घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याचा दर प्रतितोळा 47935 रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात 0.34 टक्क्यांची वाढ झाली असून हा दर प्रतिकिलो 68145 रुपये इतका झाला आहे.
गेल्या सत्रातही सोन्याच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने आणि चांदीच्या किमतीवर दबाव आहे. यावेळी ते $ 8.55 (-0.47%) च्या घसरणीसह $ 1,813.65 च्या पातळीवर व्यापार करीत होते. यावेळी चांदी $ 0.085 (-0.33%) कमी होऊन $ 25.490 प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करीत होती. सध्या डॉलर निर्देशांक 0.14% ने 91.938 च्या पातळीवर खाली आहे.
राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव?
मुंबई- 46960 रुपये प्रतितोळा पुणे- 46,230 रुपये प्रतितोळा नागपूर- 46960 रुपये प्रतितोळा नाशिक- 46,230 रुपये प्रतितोळा
रेकॉर्ड स्तरापेक्षा 8200 रुपयांनी स्वस्त
गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 8200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.
पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?
आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?