Gold Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 10200 रुपयांनी स्वस्त

Gold price | चीनची एव्हरग्रांड ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर असल्यान सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात चढउतार सुरु आहेत. मंगळवारी सोन्याचा दर 0.15 टक्क्यांनी घसरुन 46,001 रुपये प्रतितोळा झाला. तर चांदीच्या दरातही 0.22 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो दर 60,503 रुपये इतका झाला आहे.

Gold Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 10200 रुपयांनी स्वस्त
गोल्ड एक्सचेंजचे नाव काय असेल - गोल्ड एक्सचेंज हे शेअर बाजारासारखे असेल. शेअर्सप्रमाणे ट्रेडिंगही करता येईल. तसेच, सोन्याची भौतिक डिलिव्हरी होईल, म्हणजेच सोने देखील खरेदी केले जाऊ शकते. सेबीने मसुद्याच्या प्रस्तावांमध्ये नमूद केले आहे की नवीन गोल्ड एक्सचेंजचे नाव इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट असेल.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 10:59 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्या आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या दरात किंचीत उसळी पाहायला मिळाली होती. ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.33 टक्क्यांनी वाढला होता.

चीनची एव्हरग्रांड ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर असल्यान सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात चढउतार सुरु आहेत. मंगळवारी सोन्याचा दर 0.15 टक्क्यांनी घसरुन 46,001 रुपये प्रतितोळा झाला. तर चांदीच्या दरातही 0.22 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो दर 60,503 रुपये इतका झाला आहे.

सोने उच्चांकी पातळीपेक्षा 10200 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा 56200 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या 10200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.