Gold Silver price today: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा दर

gold price | डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 20 रुपयांनी वधारून 46580 च्या पातळीवर पोहोचली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 156 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 62615 रुपये इतका झाला आहे.

Gold Silver price today: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा दर
जर कोणाला फिजिकल सोने हवे असेल तर ईजीआरला तिजोरीत सरेंडर करावे लागेल. वॉल्ट मॅनेजर ग्राहकाला EGR घेऊन फिजिकल सोने देईल, तिथे EGR रद्द होईल. रद्द केलेल्या ईजीआरची माहिती एक्सचेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कॉर्पोरेशनलाही पाठवली जाईल. वितरित केलेल्या सोन्याच्या गुणवत्तेवर वाद असल्यास, स्वतंत्र एजन्सीचा अहवाल वैध असेल.
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 12:08 PM

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने गुरुवारी सोन्याचा भाव वधारताना दिसला. 45800 च्या स्तरापर्यंत घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. गुरुवारी सकाळी वायदे बाजारात सोन्याचा भाव वाढून 46394 च्या स्तरापर्यंत पोहोचला. तर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 20 रुपयांनी वधारून 46580 च्या पातळीवर पोहोचली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 156 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 62615 रुपये इतका झाला आहे.

यापूर्वी बुधवारी MCX वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव 0.15 टक्के किंवा 68 रुपयांच्या वाढीसह 46,030 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. तत्पूर्वी मंगळवारी ल्ली सराफा बाजारात सोने 176 रुपयांनी कमी होऊन 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले होते. सोमवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रतितोळा 45,286 रुपये इतका होता.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची उद्या शेवटची संधी

सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका 5-9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान उघडण्यात आली. सेटलमेंटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज कालावधीत बॉण्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. गोल्ड बॉण्डची किंमत बाजारातील सोन्याच्या स्पॉट प्राईसशी जोडलेली असते. यामध्ये गुंतवणुकीवरील व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त परतावा उपलब्ध आहे. देशातील नागरिक हिंदू अविभक्त कुटुंब ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजना अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, ज्यांना भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करायची नाही.

…तर एक तोळा सोन्याचा भाव 90 हजारांवर पोहोचणार

कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.