सोने खरेदी करायला जाताय, जाणुन घ्या काय आहेत आजचे भाव
अमेरिकन फेडरलच्या भूमिकेनंतर सोन्याच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. सोने गेल्या चार पाच दिवसांपासून स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किंमती दररोज बदलतात. दिवसभरात दोनवेळा सोन्याच्या किंमतीत बदल होतो. सकाळी आणि संध्याकाळी सराफा बाजारात नव्याने बदललेल्या किंमती जाहीर करण्यात येतात. आज सोन्याचे आणि चांदीचे भाव काय आहेत ते जाणून घेऊयात..
Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या चार पाच दिवसांपासून बदल दिसून येत आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर ही दिसून येत आहे. अमेरिकन फेडरलच्या (American federal) भूमिकेनंतर सोन्याच्या किंमती ब-याच अटोक्यात आल्या आहेत. सोने गेल्या चार पाच दिवसांपासून स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किंमती दररोज बदलतात. दिवसभरात दोनवेळा सोन्याच्या किंमतीत बदल होतो. सकाळी आणि संध्याकाळी सराफा बाजारात (Sarafa Bazar) नव्याने बदललेल्या किंमती जाहीर करण्यात येतात.दरम्यान सरकारने सॉविरन गोल्ड बाँड (Gold Bond) योजनेच्या माध्यमातून सुवर्ण रोखे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये होते. तर गेल्या व्यापारी सत्रात या मौल्यवान धातुसाठी ग्राहकांना 47750 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे प्रति ग्रॅम सोन्याचे भाव 100 रुपयांनी कमी झाले आहे. प्रत्येक राज्यातील कर प्रणालीमुळे सोन्याच्या किंमतीत भारतभर बदल असतो.
काय आहे तुमच्या शहरातील भाव
गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47650 रुपये आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,980 रुपये आहे. चांदी प्रति किलो आज 60,900 रुपये भावाने विक्री होत आहे. काल चांदीचा भाव 61,000 रुपये होता.
पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 47700 रुपये आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,030 रुपये आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो 60,900 रुपये आहे.
नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47700 रुपये आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,030 रुपये आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो 60,900 रुपये आहे.
नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47700 रुपये आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,030 रुपये आहे. चांदी प्रति किलो आज 60,900 रुपये भावाने विक्री होत आहे. काल चांदीचा भाव 61,000 रुपये होता.
दहा दिवसांत सोने उतरले
10 जून 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47,750 रुपये होते. 19 जून 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 47,650 रुपये आहे. म्हणजेच 100 रुपयांनी सोन्याचे दर उतरले आहेत. तर 10 जून 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 52,100 रुपये होते. 19 जून 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 51,980 रुपये आहे. म्हणजेच 120 रुपयांनी सोन्याचे दर उतरले आहेत. 12 आणि 13 जून 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर सर्वाधिक म्हणजे प्रति 10 ग्रॅमसाठी 52,760 रुपये होते.
अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.