सिबिल रेकॉर्ड चांगला ठेवण्यासाठी काय कराल?
तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. | Credit score
मुंबई: कर्ज मिळवण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असो, बँका नेहमी एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर तपासतात. याला क्रेडिट स्कोर असेही म्हणतात. ज्यामध्ये कर्जदाराचा आर्थिक रेकॉर्ड उपलब्ध असतो. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरच्या मदतीने बँका कर्जाची परतफेड वेळेवर करतात की नाही हे पाहतात. CIBIL स्कोअर द्वारे, एखादी व्यक्ती कोणत्याही कर्जाच्या देयकामध्ये डिफॉल्ट झाली आहे की नाही हे तपासू शकते किंवा त्याने कोणताही EMI भरला नाही, हे बँकांना कळते.
तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
नावात बदल केल्यास सर्व कागदपत्रांवर तशी दुरुस्ती करा. तसेच बँका आणि इतर संस्थांना तशी माहितीही द्या. अन्यथा नाव बदलल्यानंतर कागदोपत्री तशा सुधारणा न केल्यास त्याचा थेट परिणाम सिबिलमधील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.
कर्जाचे हप्ते वेळेवर फेडा
कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.
क्रेडिट कार्डासाठी ढीगभर अर्ज करु नका
तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.
मिनिमम ड्यूजचा पर्याय शक्यतो टाळाच
तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.
युटिलाझेशन रेटचे गणित ध्यानात ठेवा
क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. समजा एक लाख रुपयांची लिमीट असलेल्या क्रेडिट कार्डावर आऊटस्टँडिंग ड्युज 25000 असेल. मात्र तुम्ही क्रेडिट लिमिट घटवून 60 हजार केली तर युटिलायझेशन रेट 25 टक्क्यांवरून वाढून 42 टक्क्यांवर पोहोचेल.
वेळेआधी कर्ज फेडण्याची घाई करु नका
तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.
संबंधित बातम्या:
पीएम मोदींची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक; पेट्रोल अन् डिझेलच्या किमती कमी होणार?
ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण
मोठ्या पगाराचे दिवस देशात परतणार; वेतनवाढ पूर्वीपेक्षा जास्त होणार, कंपन्यांमध्ये बंपर भरती