नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ व्याजाचे पैसे खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात

आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळाले नाहीत पण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम विभागनिहाय जमा केल्यामुळे अजून सर्वांच्या खात्यात पैसा जमा झालेले नाहीत.

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ व्याजाचे पैसे खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:30 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्व नोकरदारांनाही दिवाळीची भेट द्यायचे ठरवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व खातेधारक त्यांच्या खात्यात किती पीएफ पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत.

आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळाले नाहीत पण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम विभागनिहाय जमा केल्यामुळे अजून सर्वांच्या खात्यात पैसा जमा झालेले नाहीत.

7 वर्षांच्या कमी स्तरावरचा व्याजदर

कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 8.5 टक्के दराने ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील. गेल्या वर्षी 2019-20 या आर्थिक वर्षात केवायसीच्या गडबडीमुळे बर्‍याच ग्राहकांना बराच काळ थांबावे लागले. ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात कोणताही बदल न करता 8.5% ठेवण्याचा निर्णय घेतला होता, जो मागील 7 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.

पीएफ शिल्लक कसे तपासावे? (How to check my PF Balance?)

1. SMS मार्फत- जर तुमचा यूएएन क्रमांक ईपीएफओमध्ये नोंदला असेल तर तुमची पीएफ शिल्लक माहिती मेसेजद्वारे प्राप्त होईल. यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO पाठवावे लागेल. तुमची पीएफ माहिती मेसेजद्वारे मिळणार आहे. तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर ईपीएफओ यूएएन लिहून पाठवावी लागेल. पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. पीएफ शिल्लक असल्यास आपले यूएएन, बँक खाते, पॅन (PAN) आणि आधार (AADHAR) आवश्यक आहे, तसेच ते दोन्ही जोडलेले असणे आवश्यक आहे. 2. मिस्ड कॉलद्वारे शिल्लक जाणून घ्या- तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर PF चा तपशील ईपीएफओच्या मेसेजद्वारे उपलब्ध होईल. येथे आपले यूएएन, पॅन आणि आधार लिंक करणे देखील आवश्यक आहे.

3. ऑनलाईन शिल्लक तपासा

> ईपीएफओ वेबसाईटवर लॉगिन करा, epfindia.gov.in या ई-पासबुकवर क्लिक करा. >> ई-पासबुकवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज passbook.epfindia.gov.in वर येईल. >> येथे आपणाला वापरकर्ता नाव (यूएएन नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. >> सर्व तपशील भरल्यानंतर आपण एका नवीन पृष्ठावर येईल आणि येथे आपल्याला सदस्य आयडी निवडावा लागेल. >> येथे ई-पासबुकवर तुमचा ईपीएफ शिल्लक मिळेल. >> आपण उमंग अॅपवर शिल्लक देखील तपासू शकता >> आपले उमंग अॅप (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. >> आपल्याला दुसर्‍या पृष्ठावरील कर्मचारी केंद्रित सेवांवर (employee-centric services) क्लिक करावे लागेल. >> येथे पासबुकवर क्लिक करा, तुमचा यूएएन नंबर व पासवर्ड (ओटीपी) क्रमांक टाका. आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. यानंतर आपण आपला पीएफ शिल्लक तपासू शकता.

इतर बातम्या

Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.