मद्यप्रेमींसाठी खुशखबर; नववर्ष, ख्रिसमसला मिळणार स्वस्त दारू

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार विदेशी मद्यावरील टॅक्समध्ये जवळपास निम्मी कपात करण्यात आली आहे. मात्र अजूनही दारूची जुन्यात दराने विक्री होत आहे. मात्र आता लवकरच नव्या दराने दारूच्या विक्रीला सुरुवात होणार आहे.

मद्यप्रेमींसाठी खुशखबर; नववर्ष, ख्रिसमसला मिळणार स्वस्त दारू
उल्हासनगरचा 'चांदनी डान्सबार' अखेर सील
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 12:51 PM

मुंबई :  काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार विदेशी मद्यावरील टॅक्समध्ये जवळपास निम्मी कपात करण्यात आली आहे. पूर्वी विदेशी मद्यावर 300 टक्के टॅक्स आकारण्यात येत होता. आता त्यामध्ये कपात करून तो 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. टॅक्स कमी झाल्यामुळे मद्य स्वस्त होईल अशी अपेक्षा मद्यप्रेमींना होती. मात्र दुकानात जुना दारूचासाठा असल्याने अद्यापही दारूचे दर कमी झालेले नाहीत. मद्याप्रेमींसाठी दिलासा देणारी बातमी म्हणेज ख्रिसमसच्या आसपास विदेशी दारूचा नवासाठा उपलब्ध होणार असल्याने त्यांना ख्रिसमस सेलेब्रेशनसाठी स्वस्तात दारू खरेदी करता येऊ शकते. 

…म्हणून आजूनही आहे दारू महाग

याबाबत बोलताना दारू विक्रेत्यांनी सांगितले की, सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी केला आहे. तो आता 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. परंतु दुकानात अजूनही दारूचा जुनाच साठा असल्याने, दारू पुर्वीच्याच दराने विकली जात आहे. येत्या दहा दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दुकानात नवासाठा येऊ शकतो. हा नवा मद्यासाठा आल्यास दारू स्वस्त मिळेल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे अनेक देशांनी प्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळे दारू आयात करण्यामध्ये अनेक निर्बंध येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल वाढणार

दरम्यान विदेशी मद्यावरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत बोलताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयाचा सरकारला  मोठा फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे दारू विक्रीमध्ये वाढ होऊन, महसूल वाढणार आहे. तसेच दारू स्वस्त झाल्यामुळे दारू तस्करीला देखील आळा बसेल. दरवर्षी लाखो रुपयांच्या दारूची तस्करी होते. तस्करी थांबल्यास सरकारचा महसूल वाढू शकतो. दारूवरील टॅक्स कमी केल्याने सर्वच प्रकारच्या विदेशी मद्याचे दर हे 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

संबंधित बातम्या 

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.