7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, देवी पावणार, महागाई भत्त्यासाठी ही तारीख निश्चित! पगारात होणार एवढी वाढ

7th Pay Commission DA Hike 2022 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांना देवी पावणार आहे. नवरात्रीत त्यांना महागाई भत्ता मिळणार असल्याचे वृत्त आहे.

7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, देवी पावणार, महागाई भत्त्यासाठी ही तारीख निश्चित! पगारात होणार एवढी वाढ
खुशखबर, लवकरच डीए मिळणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:43 AM

7th Pay Commission Latest News | केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) नवरात्रीत देवी पावणार आहे. देशभरातील केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची (DA) प्रतीक्षा संपली आहे. त्यांना तिसऱ्या माळेला म्हणजे 28 सप्टेंबरला महागाई भत्ता मिळणार आहे. सरकार लवकरच याविषयीची औपचारिक घोषणा करणार आहे. या वृत्तानुसार, सप्टेंबरच्या पगारासोबत (Payment)महागाई भत्ताही दिला जाणार आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 38 टक्के होणार आहे. यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीचाही लाभ देण्यात येणार आहे.

किती असेल डीए?

1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. या निर्देशांकात पहिल्या अर्ध्या डेटामध्ये 0.2 अंकांची वाढ झाली आहे. आणि तो 129.2 वर पोहोचला आहे.

मार्च महिन्यात वाढला डीए

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगासंबंधीच्या सर्व चर्चा या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. महागाई भत्ता हा वेतनाचा एक भाग असतो. सरकार यामध्ये दर सहा महिन्याला बदल करते. गेल्या वेळी मार्च 2022 मध्ये महागाई भत्ता देण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना सरकारने 3 टक्के वाढ दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांहून 34 टक्के झाला होता. भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आधारे कर्मचाऱ्यांचा डीए ठरवण्यात येतो. आता महागाई आणि ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डीए किती टक्के होईल, हे सरकार ठरवणार आहे.

हे सुद्धा वाचा

डीएचे 38 टक्के कधी येणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2022 च्या पगारात नवीन महागाई भत्ता(New Dearness Allowance) देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचेल. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून गृहित धरण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पगारात पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकीही मिळणार आहे.

पगार कितीने वाढणार?

38 टक्के महागाई भत्त्यानुसार, 18,000 रुपयांच्या मूळ वेतनावर वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपये म्हणजेच मासिक 720 रुपये वाढतील. कॅबिनेट सचिव स्तरावर मूळ वेतन 56,900 रुपये आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ वेतनाच्या वार्षिक महागाई भत्त्यात एकूण 27 हजार 312 रुपयांची वाढ होईल.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.