EPFO PF Balance | पीएफधारकांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा होणार भरमसाठ व्याज, कधी पर्यंत येईल व्याजाची खेप? मग ही माहिती वाचाच

EPFO PF Balance | मोदी सरकार लवकरच देशभरातील 6.5 कोटी पीएफधारकांना गुड न्यूज देणार आहे. त्यांच्या खात्यात पीएफची रक्कम जमा होणार आहे.

EPFO PF Balance | पीएफधारकांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा होणार भरमसाठ व्याज, कधी पर्यंत येईल व्याजाची खेप? मग ही माहिती वाचाच
व्याजाची रक्कम लवकरच खात्यातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 7:05 PM

EPFO PF Balance | मोदी सरकार (Modi Government) लवकरच देशभरातील 6.5 कोटी पीएफधारकांना (PF Account Holder) गुड न्यूज देणार आहे. त्यांच्या खात्यात पीएफ व्याजाची (Interest) रक्कम जमा होणार आहे. सरकारने व्याजदराबाबत पीएफ धारकांना नारज केले असले तरी हा व्याजदर ही अत्यल्प नाही. पीएफ धारकांचे नुकसान होणार असले तरी व्याजाच्या रुपाने भरमसाठ रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या (August Month End) अखेरीस ही रक्कम खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात कोट्यवधी पीएफ धारकांना पीएफने मोठा हातभार दिला. त्यांना वेळेवर कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजावे लागले नाही. नियमातील शिथिलतेमुळे अनेकांना वेळीच मोठी रक्कम मिळाली. आता ज्यांच्या खात्यात रक्कम शिल्लक आहे. त्यांना भरमसाठ व्याज मिळणार आहे.

एसएमएस सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

– EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल.

हे सुद्धा वाचा

– तुम्हाला फक्त 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवायचा आहे. इथे तुमच्या प्राधान्याच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे दर्शविली जातात. ( उदा. ‘ENG’) तुम्हाला एसएमएस तमिळमध्ये मिळवायचा असल्यास ‘TAM’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ वगैरे लिहू शकता. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

– या संदर्भात, तुम्ही तुमचे UAN तुमचे बँक खाते, आधार आणि PAN शी सिंक करायला विसरू नका. कारण EPFO त्याच्या सदस्यांचे तपशील संग्रहित करते. तुम्ही तुमच्या नियोक्त्याला तुमच्यासाठी सीडिंग करण्यास देखील सांगू शकता.

मिस्ड कॉल सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

– कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता.

– यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून कॉल करावा लागेल.

– तुम्ही UAN पोर्टलवर नोंदणी केली असल्यास तुम्हाला तपशील प्रदान केला जाईल. या संदर्भात तुम्हाला तुमचा UAN लक्षात ठेवण्याची गरज नाही.

कसे मोजणार व्याज ?

ऑगस्टअखेर पीएफचे व्याज तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. पण तुमच्या खात्यात किती आणि कशी रक्कम येईल, त्याचा ठोकताळा एका उदाहरणाच्याआधरे पाहुयात.

येथे पीएफवरील व्याज 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर मोजण्यात आले आहे.

बेसिक सॅलरी + डीए = 15,000 रुपये

ईपीएफमधील कर्मचार् यांचा वाटा = रु. 15,000 चे 12%= 1,800 रुपये

ईपीएसमध्ये कंपनीचे योगदान = 15,000 रु.चे 8.33% = 1,250 रुपये

ईपीएफमध्ये कंपनीचे योगदान = एम्प्लॉइचा हिस्सा- ईपीएसमध्ये कंपनीचे योगदान = 550 रुपये

दरमहा ईपीएफमध्ये जमा होणारी रक्कम 1800 रुपये 550 – 2,350 रुपये

आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याजदर 8.10%

त्यानुसार हे व्याज दरमहा 8.10 टक्के असेल. 12= 0.675%

अशा प्रकारे मोजणार व्याज

एप्रिलअखेर ईपीएफ खाते शिल्लक = 2,350 रुपये

मे महिन्यात ईपीएफ खाते पुन्हा इतके योगदान देईल = 2,350 रुपये

मे अखेर ईपीएफ खात्यात एकूण जमा = 4700 रुपये

मे महिन्याच्या अखेरीस जमा होईल ईपीएफ, इतके व्याज 4700 X 0.675% – 31.79 रुपये

मे महिन्याच्या अखेरीस हे व्याज 31.79 असेल

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.