Good News | व्हॉट्सअप युजर्ससाठी गुडन्यूज, न आवडणाऱ्या लोकांपासून लपवा ओळख, स्टेट्स

व्हॉट्सअप युजर्सच्या सुरक्षेसंदर्भात अधिक चौकस असते. त्यांच्या खासगी आयुष्यालाही  व्हॉट्सअप महत्वं देते.आता युजर्ससाठी एक अनोखं फिचर येऊ घातलं आहे. काय आहे हे फिचर आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

Good News | व्हॉट्सअप युजर्ससाठी गुडन्यूज, न आवडणाऱ्या लोकांपासून लपवा ओळख, स्टेट्स
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 1:30 PM

व्हॉट्सअप ( WhatsApp) युजर्ससाठी एकाहून एक सरस फीचर घेऊन येत आहे. युजर्सच्या सुरक्षेसोबतच त्याची प्रायव्हीसी जपण्याचा प्रयत्न व्हाट्सअप करत असते. आता मॅसेजिंग अॅप ( Messaging App ) व्हाट्सअपने खास फीचर आणलं आहे. सध्या हे फिचर बाल्यवस्थेत आहे. त्याची चाचणी सुरु आहे. या नव्या फिचरमुळे युजर्स त्यांचा प्रोफाईल फोटो ( profile photo, लास्ट सीन( Last Seen ) आणि स्टेट्स( status) ज्यांनी ते बघू नये असे वाटते  अशा नकोशा लोकांपासून लपविता येईल. वेब वर्जनसाठी याच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यात अशा नकोशा क्रमांकासाठी स्टेट्स अपडेट करुन त्यांच्यापासून तुमचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन आणि स्टेटस तुम्हाला लपविता येणार आहे. रिपोर्टनुसार, व्हाट्सअप पहिल्यांदा एड्राईड (Android)  आणि आयओएस (iOS) मोबाईल वापरकर्त्यांसाठी हे फिचर लाँच करणार आहे.

My Contacts Except हा नवा पर्याय

WABetaInfo नुसार, व्हाट्सअप या फिचरची टेस्टिंग करत आहे. युजर्स त्यांच्या व्हाट्सअप वेबवर त्यांची कॉन्टॅक्ट इन्फो जशी की, प्रोफाईल पिक्चर, लास्ट सीन, स्टेट्स या गोष्टीना निवडक क्रमांकासाठी, वापरकर्त्यांपासून लपवून ठेऊ शकता. हे फिचर  व्हाट्सअप पहिल्यांदा एड्राईड (Android)  आणि आयओएस (iOS) मोबाईलमध्ये वापरण्यात येणार आहे.  सध्यस्थिती युजर्सजवळ त्यांचे लास्ट सीन, प्रोफाईल फोटो, स्टेट्स अशी माहिती ‘everybody, nobodyआणि ‘my contacts only’ अशा पद्धतीने  दाखवू शकतात. व्हाट्सअपचे नवीन फिचर रिलीज झाल्यास या तीन पर्यायाशिवाय युजर्सला ‘My Contacts Except’ हा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचं प्रोफाईल, लास्ट सीन आणि स्टेट्स तुम्ही अशा लोकांपासून लपवू शकता, जे तुम्हाला मुळीच आवडत नाहीत, अथवा तुम्हाला वाटतं की यांना या तीन गोष्टी दिसू नयेत.

कसा होईल फायदा

तुम्ही एखाद्या कार्यालयात काम करत आहात आणि तुम्हाला तुमच्या कलिग, सहकारी, मित्र यांना तुमचा प्रोफाईल फोटो, स्टेट्स कळू द्यायचं नसेल तर तुम्ही या चौथ्या पर्यायाची निवड करुन तुमची प्रायव्हीसी जपू शकता. WABetaInfo नुसार बीटा युजर्स यांना व्हाट्सअप वेब/डेस्कटॉप यावर हे फिचर दिसू शकणार नाही. त्यांना ‘My Contacts Except’ हा आणखी एक पर्याय दिसणार नाही. सध्या हे अप विकसीत होण्याच्या अवस्थेत असून ते युजर्सला कधी मिळणार याची काहीएक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याची चाचणी सुरु असून या फिचर्सची सध्या चर्चा सुरु आहे.

Temperature | नागपुरात भरली हुडहुडी, तापमानात घट, कसा राहील पुढचा आठवडा?

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

धक्कादायक! ओबीसींची जनगणनाच झाली नाही, केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रं; भुजबळांचा दावा

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.