Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर…

आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते.

Aadhaar Card : आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! 'हे' केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर...
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 7:05 PM

आधारकार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही बँकेत अकाउंट सुरु करण्यासाठी, विमानतळावर प्रवेशासाठी, अगदी बँकेतून कर्ज काढण्यासाठी अशा सगळ्याच ठिकाणी आधारकार्ड खूप उपयुक्त आहे. आधारकार्डशिवाय आपलं कोणतंही शासकीय काम होणार नाही. त्यामुळे आधारकार्ड आपल्यासोबत असणं जरुरीचं आहे. असं असताना आता आधारकार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. अर्थात रद्द होणं इतकं सोपं नाही. सरकार अपडेट करण्यासाठी नंतर फीज किंवा पैसे आकारु शकतं. कारण UIDAI ने 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या आधारकार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा प्रदान केली आहे.

विशेष म्हणजे सरकारने आधारकार्डची माहिती अपडेट करण्यासाठी अनेकवेळा डेडलाईन दिली आहे. पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी आपलं आधारकार्ड अपडेट केलेलं नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. पण रद्द होण्याची शक्यता कमी म्हणता येईल. पण तरीही आधारकार्ड अपडेट करणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापही आपले आधारकार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी तातडीने ‘MyAadhaar’ पोर्टलवर जावून आपली माहिती अपलोड करणं आवश्यक आहे.

आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक का?

आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते. गेल्या 10 वर्षांमध्ये आपला फोटो आणि राहत असलेला पत्ता यामध्ये बदला झालेला असू शकतो. त्यामुळे आपलं आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. आधारकार्डद्वारे ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. तसेच यामुळे शासनादेखील योग्य माहिती मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, UIDAI ने 10 वर्षांआधीचे आधारकार्ज अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या डेडलाईनला याआधी सलग तीन वेळा वाढवण्यात आलेलं आहे. याआधी 14 मार्च, त्यानंतर 14 जून, त्यानंतर 14 सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून याआधी देण्यात आली होती. आता हीच डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत आहे. ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे. त्यानंतर कदाचित सरकारकडून कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

आधारकार्ड अपडेट कसं करावं?

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी ‘MyAadhaar’या पोर्टलवर जावं. इथे लॉगिन केल्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तिथे विचारण्यात आलेले उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा. आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपलं आधारकार्ड अपडेट करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कोणकोणते?

  • रेशनकार्ड
  • मदतान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • मनरेगा/एनआरईजीएस जॉब कार्ड
  • श्रम कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • पॅन/ई-पॅन कार्ड
  • सीजीएचएस कार्ड
  • ड्राइविंग लायसन्स
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज.
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप.
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका.
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video.
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी.
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया.
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका.
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर...
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक.